सैनिक हो तुमच्यासाठी, एक सैनिक एक पणती
By Admin | Published: November 5, 2016 03:27 AM2016-11-05T03:27:41+5:302016-11-05T03:27:41+5:30
शहीद भारतीय जवानांसाठी एक सैनिक एक पणती या द्वारे कृतज्ञतेच्या भावनेतून श्रद्धांजली अर्पण करून नागरिकांनी देशभक्तीचा प्रत्यय दिला
डहाणू/बोर्डी : शहीद भारतीय जवानांसाठी एक सैनिक एक पणती या द्वारे कृतज्ञतेच्या भावनेतून श्रद्धांजली अर्पण करून नागरिकांनी देशभक्तीचा प्रत्यय दिला. दिवाळी सणाच्या निमित्ताने बोर्डी, चिखले आणि घोलवड गावातील नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी एकित्रत येऊन सामुहिकरीत्या सैनिकांसाठी दीपावलीचा एक दिवा समर्पित केला.
देशाच्या सुरक्षेसाठी घरावर तुळशीपत्र ठेवणाऱ्या आणि प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिवाळिनिमित्त विविध गावांमध्ये कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. २९ आॅक्टोबर रोजी बोर्डी गावातील चाफवाडी मंडळ आणि लक्ष्य फाउंडेशनने प्रत्येक सैनिक एक पणती हा कार्यक्र म घेतला. या वेळी बोर्डी परिसरातील कै. रामचंद्र यांच्या पत्नी सुनंदा आडगा यांना, तर विपुल सावे, सुनील सावे, किसन मांगेला, विजय कोल आदि. निवृत्त सैनिकांना आमंत्रित केले होते.
दीप प्रज्वलनासह कारगील युद्धात परमवीर चक्र विजेत्यांची माहिती तसेच कविता उपस्थितांना ऐकविण्यात आली. ३० आॅक्टोबरच्या सायंकाळी सहा वाजता चिखले गावात महात्मा गांधी तंटामुक्त समितीने एक ग्रामस्थ एक पणती सैनिकांना समिर्पत करून सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी रिठी ते वडकती या गावातील प्रमुख रस्त्याच्या दुतर्फा ग्रामस्थांनी दीप प्रज्वलीत केले. देशभक्तीपर घोषणा आणि समर गीतांनी परिसर दुमदुमला होता. या मध्ये शाळकरी विद्यार्थी, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदवला होता. (वार्ताहर)
>जवानांना श्रद्धांजली
रविवार सायंकाळी सात वाजता घोलवड ग्रामस्थांनी शिवाजी मैदानात एकित्रत येऊन शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. या वेळी निवृत सैनिक राम राऊत, विजय कोल आणि निवृत्त कोसगार्ड अधिकारी भरत मेस्त्री उपस्थित होते. दरम्यान, देशाचे पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला डहाणू तालुक्यातील विविध गावांमधून भरभरून प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.