Deepak Kesarkar vs Uddhav Thackeray: मुख्यमंत्री तुम्हीच रहा, पण... एकनाथ शिंदेंची ठाकरेंना शेवटची ऑफर होती; केसरकरांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 05:48 PM2023-02-08T17:48:21+5:302023-02-08T17:51:10+5:30
Deepak Kesarkar vs Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेच मविआतून बाहेर पडणार होते; दीपक केसरकरांनी सांगितले काय घडले...
शिवसेना पक्ष, निवडणूक चिन्ह आणि संबंधीत विषयांवर निवडणूक आयोगाकडे आणि सुप्रीम कोर्टात केसेस सुरू आहेत. उद्धव ठाकरेंनी त्यांचे जे काही म्हणणं आहे ते त्यांनी सुप्रीम कोर्टात किंवा निवडणूक आयोगात सांगावे. केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी हे सुरू आहे. सहानुभूतीचा जोरावर जनमत मिळवून मत मिळवावी अस सुरुय. ठाकरेंना काय वाटते ते महत्वाचे नाहीय, सुप्रीम कोर्टाने असे कोणतेही आदेश दिले नाहीत. ते ठाकरेंचे का ऐकतील असा सवाल शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे.
ठाकरेंची सुरु असलेली सगळी धडपड व्यर्थ आहे. तुम्ही जे म्हणताय ते सगळं खरं का ठरेल, लोकांना खर काय ते सांगायला हवे. भाजपासोबत बोलणी सुरु होती, त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेले आम्ही लोक आहोत. मी काय कोणी मोठा मनुष्य नाही पण मी ते घडवून आणल होत. पक्षाच हित म्हणून मी ते केले. पंतप्रधानांशी भेट घडवून आणली त्यावेळी बोलणी केली आणि ती चूक दुरुस्त करायची ती संधी होती. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार होते, असा गौप्यस्फोट केसरकर यांनी केला.
ठरलेल्या गोष्टी उद्धव ठाकरे यांनी केल्या नाहीत त्याप्रमाणे भूमिका घेतली नाही. कुटुंबावर जे काही आरोप झाले त्याने ते दुखावले गेले असतील पण दुखावले गेले म्हणून अस वागणे चुकीचे होते. आजसुद्धा तुम्ही सांगा की काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडा आम्ही सगळे मुंबईला येऊ, असे मी तेव्हाही सांगितले होते. पंतप्रधान आणि बाळासाहेब यांच्यात एक वेगळे बॉंडिंग होते, असे केसरकर म्हणाले.
पक्ष ही कधीही कोणाची खाजगी प्रॉपर्टी नसते. बाळासाहेब होते त्यावेळी कधीही निवडणूक होत नव्हती. पक्ष हा कुठल्यातरी कुटुंबाची खाजगी प्रॉपर्टी अस त्यांनी म्हणणं निवडणूक आयोगाकडे लिहून द्यावे. आपल्या घराला लागलेली आग आधी विझवायला लागते. मुख्यमंत्री तुम्हीच रहा पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडा अस म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंची पण तुम्ही दखल घेतली नाहीत. उद्धव ठाकरे दिल्लीवरून कबूल करून आले होते की मी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो पण त्यांनी तस केलं नाही, असा आरोप केसरकर यांनी केला.