आत्मचिंतन करा! - अशोक चव्हाण
By admin | Published: June 3, 2017 03:35 AM2017-06-03T03:35:32+5:302017-06-03T03:35:32+5:30
कर्जमाफीसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे संपाचे हत्यार उपसले आहे. शेतकरी संपामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कर्जमाफीसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे संपाचे हत्यार उपसले आहे. शेतकरी संपामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली असताना, राज्याचे मुख्यमंत्री मात्र, विरोधकांवर बेछूट आरोप करत आहेत, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी केली. शेतकरी आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी आत्मचिंतन करावे, असा टोलाही त्यांनी लगावला.
शेतकरी संपाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच विरोधकांवर निशाणा साधला होता. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण म्हणाले की, ‘शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तत्काळ निर्णय घेणे अपेक्षित असताना, मुख्यमंत्री बेछूट आणि बेजबाबदार आरोप करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आरोपांमुळे विरोधकांच्या नव्हे, तर शेकऱ्यांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. भाजपाच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला़