नव वर्षाच्या सुरुवातीला विठ्ठल मंदिरात मनमोहक सजावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 10:49 AM2020-01-01T10:49:08+5:302020-01-01T10:53:31+5:30
५० हजार ब्ल्यू डीजे फुलांनी सजले विठ्ठल मंदीर; आळंदीच्या ठाकूर परिवाराची सेवा
पंढरपूर : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी श्री विठ्ठल मंदिरात ब्लू डि.जे. या फुलांनी मनमोहक सजावट करण्यात आली आहे. यामुळे विठ्ठल-रुक्मिणीच्या मुर्तीसह गाभारा पाहून देखील भाविक अधिक समाधानी होत आहे.
श्री विठ्ठल मंदिरात सेवा करण्याबाबत आळंदी येथील प्रदिप ठाकुर परिवाराने कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्याकडे इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार ठाकुर यांना नवीन वर्षाच्या सुरुवातीला मंदिरात सजावट करण्याची संधी अधिकाºयांनी दिली होती. त्यानुसार त्यांनी विठ्ठल-रुक्मिणी मातेचा गाभारा ब्ल्यू डि.जे. या फुलांनी सजावट करण्याचे ठरवले.
त्यासाठी ३५ हजार रुपयांची ५० हजार फुले मागवण्यात आली होती. मंगळवारी दिवसभर साचे बनवण्याचे काम सुरु होते. मंगळवारी मंदिरात गर्दी कमी झाल्यानंतर रात्री ११ ते १२ या वेळेत ते साचे बसवण्यात आले. तसेच आवश्यक ठिकाणी हातांनी फुलूे बसवण्यात आली. हे सर्व काम २० कामगारांच्या सहाय्याने केले असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितली.