माटुंग्याच्या पुलाखाली अवतरली सुंदर बाग
By Admin | Published: June 24, 2016 03:53 PM2016-06-24T15:53:26+5:302016-06-24T16:22:21+5:30
शहरांमधल्या पुलाखालचा वापर किती सुंदर आणि विधायक कामासाठी होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण माटुंग्यामधल्या इस्टर्न एक्सप्रेस वेवरच्या नानालाल उड्डाण पुलाखालील बागेनं घालून दिलं आहे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - शहरांमधल्या पुलाखालचा वापर किती सुंदर आणि विधायक कामासाठी होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण माटुंग्यामधल्या इस्टर्न एक्सप्रेस वेवरच्या नानालाल उड्डाण पुलाखालील बागेनं घालून दिलं आहे.
या पुलाखालचा भाग कचरामुक्तच नाही तर कुठल्या गाड्या पार्क केल्यात वा फेरीवाल्यांनी ठाण मांडलंय असंही नाही. गर्दुल्ले किंवा दारुड्यांनी अथवा जुगाऱ्यांनी पुलाखालचे भाग व्यापले जात असताना सर्रास दृष्टीस पडत असताना माटुंग्याचा हा पूल मात्र अपवादच आहे.
इथं, चालण्यासाठी चांगली सोय केलीय, दिव्यांची योजना उत्तम केली असल्याने संध्याकाळीही हा परीसर रमणीय वाटतो. बाजुने चांगल्या रोपांची लागवड केली असल्यामुळे प्रसन्नताही वाढली आहे.
या जागेचं सुशोभिकरण शिवसेनेच्या प्रयत्नातून झालं असून महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते या जागेचं उद्घाटन नुकतंच करण्यात आलं आहे.
रोज सकाळी व संध्याकाळी नागरिक मोठ्या प्रमाणावर या पुलाखालच्या जागेचा वापर चालण्यासाठी करतात. काहीजणांनी तर सगळ्या पुलांचा उपयोग अशा पद्धतीनं केला तर काय बहार होईल अशी भावनाही व्यक्त केली.
(फोटो सौजन्य शिवसेना फेसबुक वॉल आणि twitter@samarjeet_n )
काँग्रेस म्हणते हे तर आमचं काम
विशेष म्हणजे काँग्रेसने मात्र हे काम काँग्रेसच्या नगरसेविका नयना शेठ यांचं असल्याचा दावा केला आहे. स्थानिक नागरिक मात्र, शिवसेनेनं केलेलं असो वा काँग्रेसनं, ही सुविधा चांगली आहे, असंच मत व्यक्त करताना दिसत आहेत.
Mumbai’s 1st garden-under-flyover ws thrown open 4 public use @Matunga by Cong Corportr Nayna sheth@sanjaynirupampic.twitter.com/Kz9MPFtexM
— Mumbai Congress (@Mumbai_Congress) June 15, 2016