अभ्यासात व्यत्यय होत असल्याने आवाज कमी करा, असे सांगणे बेतले जिवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 03:45 AM2017-12-21T03:45:22+5:302017-12-21T03:45:38+5:30

अभ्यासात व्यत्यय होत असल्याने आवाज कमी करा, असे सांगणे मुलुंडमधील बारावीतील विद्यार्थ्याच्या जिवावर बेतले. सोमवारच्या या घटनेत अलाउद्दिन पठाण (१८) याचा मृत्यू झाला.

Because of the interruption in the study, reduce the noise | अभ्यासात व्यत्यय होत असल्याने आवाज कमी करा, असे सांगणे बेतले जिवावर

अभ्यासात व्यत्यय होत असल्याने आवाज कमी करा, असे सांगणे बेतले जिवावर

googlenewsNext

मुंबई : अभ्यासात व्यत्यय होत असल्याने आवाज कमी करा, असे सांगणे मुलुंडमधील बारावीतील विद्यार्थ्याच्या जिवावर बेतले. सोमवारच्या या घटनेत अलाउद्दिन पठाण (१८) याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी अल्पवयीन मुलाला बुधवारी अटक केली आहे.
मुलुंड पश्चिमेकडील शंकर टेकडी परिसरात पठाण कुटुंबीय राहते. अलाउद्दिन पठाण हा भांडुपच्या डीएव्ही महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण घेत होता. सोमवारी दुपारी नेहमीप्रमाणे तो अभ्यासासाठी घराबाहेर बसला होता. घरासमोरील मोकळ्या जागेत मुले क्रिकेट खेळत होती. त्यांच्या गोंगाटामुळे पठाणने त्यांना आवाज कमी करण्यास सांगितले. याच रागात एका अल्पवयीन मुलाने त्याच्यासोबत वाद घालत त्याला मारहाण सुरू केली. यात पठाण जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पठाण याच्या वडिलांच्या तक्रारीवरून अल्पवयीन मुलाला मुलुंड पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.
 

Web Title: Because of the interruption in the study, reduce the noise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.