‘लोकमत’मुळेच रुजले समाजात वाचनसंस्कार

By Admin | Published: August 5, 2014 10:31 PM2014-08-05T22:31:42+5:302014-08-05T23:20:26+5:30

मुख्याध्यापकांचे मत : ‘सक्सेस स्टोरीज’चे प्रकाशन

Because of the 'Lokmat', the reading of the community has been studied | ‘लोकमत’मुळेच रुजले समाजात वाचनसंस्कार

‘लोकमत’मुळेच रुजले समाजात वाचनसंस्कार

googlenewsNext

सांगली : सोशल मीडियाच्या जमान्यात सर्वांचे वाचनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. वाचनाने जीवन समृद्ध व्हायचे असेल, तर विद्यार्थ्यांमध्ये प्रथम वाचनाची गोडी निर्माण केली पाहिजे. आजच्या काळात वाचनाची गोडी लागण्यासाठी फारसे प्रयत्न केले जात नाहीत; मात्र ‘लोकमत’च्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती नक्कीस रुजेल, असा विश्वास विविध शाळांतील मुख्याध्यापकांनी व्यक्त केला. निमित्त होते ‘लोकमत’ बालविकास मंचतर्फे देण्यात येणाऱ्या ‘सक्सेस स्टोरीज’ या पुस्तक प्रकाशनाचे.
येथील ‘लोकमत’च्या मुख्य कार्यालयात आज (मंगळवार) शहरातील विविध शाळांतील मुख्याध्यापकांच्याहस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. ग. रा. पुरोहित कन्या शाळेचे मुख्याध्यापक भारत घाडगे म्हणाले की, ‘सक्सेस स्टोरीज’ या पुस्तकामुळे विद्यार्थ्यांमध्ये जिद्द तर निर्माण होणार आहेच; परंतु सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची त्यांना प्रेरणा मिळेल. पुस्तकामध्ये थोर व्यक्तींची माहिती साध्या व सोप्या पद्धतीने मांडण्यात आली आहे.
म. के. आठवले विनय मंदिरचे द. ना. कांबळे म्हणाले की, पुस्तकात चांगली माहिती मांडली आहे. ही माहिती विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर पालकांच्यादृष्टीनेही महत्त्वाची आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ‘लोकमत’ वृत्तपत्र आमच्या शाळेचे अविभाज्य अंग बनले आहे.
राणी सरस्वती कन्या शाळेच्या सौ. एस. व्ही. माने म्हणाल्या की, ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या या पुस्तकामुळे विद्यार्थ्यांमध्येवाचन संस्कृती वाढण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्यासाठी हे पुस्तक निश्चितपणे मार्गदर्शक ठरेल. मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या एच. बी. शिंदे म्हणाल्या की, ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘संस्कारांचे मोती’ योजनेमुळे विद्यार्थ्यांची ‘लोकमत’शी नाळ जोडली गेली आहे. शाळा सुरू झाली की, विद्यार्थी ‘लोकमत’ची ही योजना कधी सुरू होणार, याची विचारणा करतात. वसंत प्राथमिक शाळेचे के. जी. शितोळे म्हणाले की, अलीकडे वृत्तपत्रातील नकारात्मक गोष्टी वाचण्याकडे कल वाढला आहे. सकारात्मक गोष्टींकडे कोणीही पहात नाही व वाचनही केले जात नाही. या पुस्तकाची विद्यार्थ्यांसह वाचकांना गोडी निर्माण होईल. पुस्तकात २६ थोर व्यक्तींच्या व्यक्तिचरित्राची उत्तम मांडणी केली आहे. कांतिलाल शहा प्रशालेचे एम. आर. चौगुले म्हणाले की, या पुस्तकाचे प्रत्येक विद्यार्थ्याने वाचन करावे. पालकांनीही हे पुस्तक वाचले पाहिजे. विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्यास या पुस्तकातील माहिती फायदेशीर आहे.
मालू हायस्कूलचे डी. आर. देशपांडे म्हणाले की, सातत्याने विविध उपक्रम राबवून ते वाचकांपर्यंत नेण्याची ‘लोकमत’ची धडपड सुरू असते. त्याचा एक भाग म्हणून ही पुस्तिका प्रकाशित करून विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर टाकण्याचा प्रयत्न केला आहे. नगरसेवक शेखर माने म्हणाले की, ‘लोकमत’मध्ये नेहमीच सकारात्मक व शहरासाठी उपयुक्त बातम्या असतात. राजकीय व सामाजिक क्षेत्रात असल्याने आज दिवसभर काय करायचे, याचे गणित ‘लोकमत’मधील बातम्या वाचून ठरविले जाते.
यावेळी ‘लोकमत’ बालविकास मंचची माहिती देण्यात आली. यावर्षीदेखील सभासद होणाऱ्या प्रत्येकाला आकर्षक गिफ्टसोबत सक्सेस बुक आणि मोफत सुविधा मिळणार आहे. याशिवाय लकी ड्रॉमधून बक्षिसेही मिळवता येणार आहेत. सभासदांना लवकरच छोटा भीम आणि क्रिशला भेटण्याची संधी मिळणार आहे. (प्रतिनिधी)

विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी कथा...
‘लोकमत’ बालविकास मंचच्या सभासदांसाठी हे ‘सक्सेस स्टोरीज’ पुस्तक मोफत देण्यात येणार आहे. या पुस्तकामध्ये अब्राहम लिंकन, वॉल्ट डिस्ने, एम. एफ. हुसेन, चार्ली-चॅप्लिन, कल्पना चावला, स्टिव्ह जॉब्स्, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, नेल्सन मंडेला यांसारख्या अनेक महान व्यक्तिमत्त्वांविषयी थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. या महान व्यक्तिमत्त्वांच्या आयुष्यातील घटनांच्याआधारे यशस्वी कसे व्हायचे, याचे मार्गदर्शन या पुस्तकातून मिळणार आहे.

Web Title: Because of the 'Lokmat', the reading of the community has been studied

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.