गटारे नसल्याने बेकरे गावातील सांडपाणी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2016 03:08 AM2016-11-19T03:08:49+5:302016-11-19T03:08:49+5:30
माणगाव ग्रामपंचायत हद्दीतील बेकरे गावातील मुख्य रस्त्यावर अद्याप गटारेच बांधण्यात आली नसल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे.
नेरळ : कर्जत तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायत हद्दीतील बेकरे गावातील मुख्य रस्त्यावर अद्याप गटारेच बांधण्यात आली नसल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. हे सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून परिणामी ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या मुख्य रस्त्यावर सांडपाणी वाहून नेण्यासाठी गटारे बांधण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे दामत विभाग अध्यक्ष जयेंद्र कराळे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
बेकरे गावातील रस्त्यावर आजवर गटारेच काढली नाहीत. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. ग्रामपंचायतीने काहीच उपाययोजना केली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सरपंचांनी नेहमीच गावाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे गावातील अनेक समस्या प्रलंबित असल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गावातील मुख्य रस्त्यावर सांडपाणी वाहत असल्याने ग्रामस्थांना त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतीच्या अनेक वेळा निदर्शनास आणूनही अद्याप यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. ग्रामपंचायतीने मुख्य रस्त्यावर गटारे बांधावीत, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. (वार्ताहर)
>बेकरे गावातील रस्त्याच्या बाजूला गटारे बांधण्यासाठी अनेक वेळा रस्त्याची पाहणी केली आहे; परंतु येथील ग्रामस्थ अडथळा निर्माण करीत आहेत. अनेक शेतक ऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे यासंदर्भात तक्र ार केली आहे. जर ग्रामस्थांनी गटारे बांधण्यासाठी सहकार्य केले तर गटारांची कामे सुरू करण्यात येतील. यासाठी तक्र ारदाराने पुढाकार घ्यावा.
- कल्पना पारधी, सरपंच, माणगाव ग्रामपंचायत