कॅमेऱ्यांचा छंदच ठरला वरदान

By admin | Published: September 15, 2016 04:03 AM2016-09-15T04:03:34+5:302016-09-15T04:03:34+5:30

असे म्हटले जाते की, ‘छंद’ माणसाला कशासाठी जगायचं हे शिकवतात. अगदी याचप्रमाणे नाशिकच्या तरुण शास्त्रज्ञाने आपल्या छंदाला दूरदृष्टी देत इतरांचे आयुष्य प्रकाशमान करण्यासाठी

Become a hobby of cameras | कॅमेऱ्यांचा छंदच ठरला वरदान

कॅमेऱ्यांचा छंदच ठरला वरदान

Next

सतीश डोंगरे,  नाशिक
असे म्हटले जाते की, ‘छंद’ माणसाला कशासाठी जगायचं हे शिकवतात. अगदी याचप्रमाणे नाशिकच्या तरुण शास्त्रज्ञाने आपल्या छंदाला दूरदृष्टी देत इतरांचे आयुष्य प्रकाशमान करण्यासाठी जगण्याचा मार्ग शोधला. अशा या छंदवेड्या शास्त्रज्ञाच्या संशोधनाची अमेरिकेलाही दखल घ्यावी लागली.
नाशिकच्या पुरुषोत्तम इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये शिक्षण घेतलेल्या रमेश रासकर या ४५ वर्षीय तरुण शास्त्रज्ञाला लहानपणापासूनच कॅमेऱ्यांचा छंद होता. वेगवेगळ्या प्रकारचे कॅमेरे हाताळणे, छायाचित्र टिपणे याची त्यांना प्रचंड आवड होती. तसेच इतरही गॅझेट्स हाताळणे त्यांना आवडत असे. शाळेत हुशार विद्यार्थी अशी त्यांची ओळख असल्याने शिक्षकही त्यांच्या चिकित्सकवृत्तीचे कौतुक करीत असत. अभ्यासात हुशार त्यातही गणित आणि विज्ञान हे दोन विषय आवडीचे असल्याने त्यांच्यातील संशोधक वृत्ती कधीच लपून राहिली नाही. आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार असलेल्या रमेशला संशोधनासाठी नेहमीच पाठबळ मिळाले. पुढे ते बारावीत राज्यात प्रथम आल्याने त्यांनी संशोधन क्षेत्रात स्वत:ला वाहून घेतले. पुणे येथे कॉम्युटर इंजिनिअरिंग केल्यानंतर त्यांनी थेट अमेरिका गाठली. तिथे एमआयटी मीडिया लॅबमध्ये कॅमेरा कल्चर रिसर्च हा ग्रुप स्थापन करून आपल्या संशोधनाला दिशा दिली; मात्र हे संशोधन जगभरातील नागरिकांना लाभदायक ठरावे हा ध्यास समोर ठेवून त्यांनी वाटचाल करण्यास सुरुवात केली.
यासाठी त्यांनी आपला लहानपणाचा ‘कॅमेऱ्याचा छंद’ हाच संशोधनाचा मुख्य घटक ठेवला. त्यांनी एक आगळा-वेगळा कॅमेरा विकसित केला. या कॅमेऱ्याच्या एका बाजूला मोबाइल फोन ठेवून मोबाइलच्या स्क्रीनवरील सुस्पष्ट अक्षरांवरून चष्म्याचा नंबर काढण्याची किंवा डोळ्यांची तपासणी करण्याची किमया या प्रयोगामुळे शक्य झाली. काही काळातच रासकर यांची ही प्रणाली अमेरिकेत ‘आयनेत्र प्रणाली’ नावाने ओळखली गेली. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या त्याच्या चाचण्यांमध्ये अचूक निदान समोर आले. या उपकरणाचा आणखी फायदा म्हणजे काही मिनिटांतच हे उपकरण मोतीबिंदूचे निदान करते. मोतीबिंदूसाठी एडगेटर्न यांनी लावलेल्या शोधापेक्षाही रासकर यांचा शोध अधिक वेगवान असल्याने अमेरिकेत त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Web Title: Become a hobby of cameras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.