साडेतीन महिन्यांत बीड जिल्ह्यात ५१ शेतकरी आत्महत्या
By admin | Published: April 26, 2017 01:56 AM2017-04-26T01:56:51+5:302017-04-26T01:56:51+5:30
कधी नापिकी तर कधी पिकाला भाव न मिळण्याच्या कारणातून जानेवारी ते एप्रिल २०१७ दरम्यानच्या साडेतीन महिन्यांत बीड जिल्ह्यात एकूण ५१ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले.
Next
बीड : कधी नापिकी तर कधी पिकाला भाव न मिळण्याच्या कारणातून जानेवारी ते एप्रिल २०१७ दरम्यानच्या साडेतीन महिन्यांत बीड जिल्ह्यात एकूण ५१ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले.
२०१६ मध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यापूर्वी मात्र सतत तीन वर्षे जिल्हा दुष्काळाच्या छायेखाली होता. गतवर्षी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी तुरीसारखी पिके घेतली. मात्र आता तूर खरेदीचे नियोजन नसल्याने पावणे दोन लाख क्विंटल तूर खरेदीविना पडून आहे. अशा संकटामुळे शेतकरी नैराश्याच्या मार्गावर जातात. साडेतीन महिन्यांत ५१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यामधील ४२ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंब शासन मदतीस पात्र ठरले आहेत. (प्रतिनिधी)