बीड जिल्हा बंदला हिंसक वळण

By Admin | Published: May 22, 2017 12:39 PM2017-05-22T12:39:21+5:302017-05-22T12:39:21+5:30

महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ सोमवारी पुकारलेल्या जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Beed district shutdown violent turn | बीड जिल्हा बंदला हिंसक वळण

बीड जिल्हा बंदला हिंसक वळण

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत 

बीड, दि. 22 -  महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ सोमवारी पुकारलेल्या जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मात्र, बंददरम्यान दुपारी बारा वाजेपर्यंतच शहरात पाच ठिकाणी दगडफेक झाली. त्यामुळे बंदला गालबोट लागले.
 
विठ्ठल रामकिसन तिडके (रा. कुंडी ता. जवळकोट जि. लातूर) याने परहीतील एकाशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून महापुरुषांबद्दल अर्वाच्च शब्दप्रयोग केले होते. त्याची ‘व्हाईस क्लिप’ तीन दिवसांपासून सोशल मीडियावरुन व्हायरल झाली आहे. सर्वपक्षीय संघटना व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तिडकेवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी जिल्हा बंदची हाक दिली होती. 
 
तिडकेला रविवारी लातर पोलिसांनी जेरबंद केले. त्यानंतर जिल्हा पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांततेचे आवाहन केले होते;परंतु तिडकेबद्दल जनमाणसांत प्रचंड रोष आहे. या पार्श्वभूमीवर सकाळी सात वाजेपासूनच अनेक व्यापाºयांनी आपली दुकाने बंद ठेवून बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. काही व्यापाºयांनी दुकाने उघडण्याचा प्रयत्न केला;परंतु तरुणांनी दुचाकी रॅली काढून बंदचे आवाहन केले. यावेळी काही संतप्त तरुणांनी दुकानांवर दगडफेक केली. 
 
बशीरगंज, माळीवेस, सुभाष रोडवर दगडफेकीच्या घटना घडल्या. जिल्हा रुग्णालयासमोर बीड आगाराची बस (क्र. एमएच २० बीएल- ९९७५) फोडण्यात आली. समोरील काच तुटून नुकसान झाले आहे. बंदला  मिळालेले हिंसक वळण व त्यामुळे निर्माण झालेले तणावपूर्ण वातावरण आटोक्यात आणण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून रॅलीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले आहे.
 
दगडफेक करणा-या तीन दुचाकी शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतल्या. त्यामुळे रॅलीतील संतप्त तरुण शिवाजीनगर ठाण्यात गोळा झाले. यावळी पोलिसांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी देण्यात आली. त्यामुळे काळी वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
 
जिल्हाभर उत्स्फूर्त प्रतिसाद
जिल्हा बंदमध्ये मराठा संघटनांसह विविध पक्ष- संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. परळीत भाजपस इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी बंदचे आवाहन केले. धारुर, शिरुर, गेवराई, माजलगाव, आष्टी, वडवणी, पाटोदा, अंबाजोगाई, केज येथेही कडकडीत बंद पाळण्यात आला. 

Web Title: Beed district shutdown violent turn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.