बीड: घरभाडे थकले म्हणून परप्रांतीय कुटुंबास डांबले!

By admin | Published: September 30, 2016 11:26 AM2016-09-30T11:26:07+5:302016-09-30T11:26:07+5:30

फरशी बसवण्याचे काम करणाऱ्या मजूर कुटुंबास घरभाड्यासाठी डांबून ठेवल्याचा प्रकार बीडमध्ये घडला.

Beed: Habitat is tired as a family! | बीड: घरभाडे थकले म्हणून परप्रांतीय कुटुंबास डांबले!

बीड: घरभाडे थकले म्हणून परप्रांतीय कुटुंबास डांबले!

Next
>ऑनलाइन लोकमत
बीड, दि. ३० -  फरशी बसवण्याचे काम करणाऱ्या मजूर कुटुंबास घरभाड्यासाठी डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला. या कुटुंबाची पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा स्नेहनगर भागातून सुटका केली.
  स्नेहनगर भागात कुटूंबासह तो गेल्या वर्षभरापासून तिथे राहत होता. पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात किरायाने राहणाऱ्या या मजुराने गेल्या वर्षभरापासून तब्बल 32 हजार 500 रुपयांचे भाडे थकवले होते. गेल्या काही दिवसापासून तो मजूर त्याची पत्नी आणि तीन मुलांना सोडून बाहेरगावी काम करत होता. घर मालकाने किरायाची मागणी केली आणि पैसे दिल्याशिवाय रुम सोडू नका असे सांगीतले, मात्र आपल्याला घरमालकाने डांबून ठेवल्याचे त्याने मोबाईलवरुन त्याच्या मित्रांना कळवले अन् मजूराला डांबून ठेवल्याच्या माहितीनंतर गुरुवारी रात्री अख्खी पोलीस यंत्रणा कामाला लागली. दरोडा प्रतिबंधक पथक, स्थागुशा आणि बीड शहर पोलीसांनी त्या घराला भेट दिली तेव्हा खरा प्रकार समोर आला. अखेर घर मालकानेच त्या मजूराला तु एक रुपयाही देवू नको, फक्त रुम सोडून जा असे सांगीतले. त्यानंतर हे प्रकरण सामोपचाराने मिटवण्यात आले असे पोलीस सुत्रांनी सांगीतले.
 
उत्तरप्रदेशातील एका गावचा राजेश पासवान हा व्यक्ती फरशी बसवण्याचे काम करतो. कामानिमित्त तो पत्नी आणि तीन मुलांसह गेल्या वर्षभरापासून बीड येथे वास्तव्यास आहे. तो ज्या ठिकाणी राहतो, ते घर पोलीस कर्मचारी शिंदे यांचे आहे. गेल्या वर्षभरापासूनचे 32,500 रुपयांचे घरभाडे पासवानकडे थकीत होते. असे असतानाच राजेश पासवान हा काही दिवस बाहेरगावी होता. या थकीत किरायाची मागणी घर मालकाने त्यांच्या कुटूंबाकडे केली. पासवान हा रविवारी बीड येथे आला असता त्यास घर मालकाने किराया दे आणि रुम खाली कर असे सांगीतले. तेव्हा त्या किरायादाराने ही माहिती फोनवरुन त्याच्या मित्रांना देत आपल्याला घरमालकाने डांबून ठेवल्याचे सांगितले. ही वार्ता कानोकान पोलीसांपर्यंत पोहचली. एस.पीं.ना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी दरोडा प्रतिबंधक पथक, स्थानिक गुन्हे शाखा आणि बीड शहर पोलीसांना आदेश देत माहिती घेण्याचे कळवले अन् त्यानंतर सारी पोलीस यंत्रणा कामाला लागली. पोलीसांनी ते घर गाठले असता वेगळीच माहिती समोर आली. अखेर घर मालकाने आपण किरायादाराला डांबून ठेवले नव्हते तर केवळ थकीत किराया दे अन् रुम सोडा इतकेच सांगीतल्याचे पोलीसांना सांगितले. या नंतर  घर मालकानेच त्या मजूराला तु एक रुपयाही देवू नको, फक्त रुम सोडून जा असे सांगीतले. त्यानंतर हे प्रकरण सामोपचाराने मिटवण्यात आले असे पोलीस सुत्रांनी सांगितले. प्रसंग किरकोळच पण पोलीस यंत्रणेला कामाला लागावे लागले.

Web Title: Beed: Habitat is tired as a family!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.