बीएड्. शिक्षण शुल्कात होणार सुधारणा!

By admin | Published: January 20, 2016 02:27 AM2016-01-20T02:27:24+5:302016-01-20T02:27:24+5:30

प्राचार्य बुटे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित; २८ फेब्रुवारीपूर्वी देणार अहवाल.

Beed Improvement in education fees! | बीएड्. शिक्षण शुल्कात होणार सुधारणा!

बीएड्. शिक्षण शुल्कात होणार सुधारणा!

Next

अकोला: राज्यातील शासकीय व खासगी अनुदानित अध्यापक विद्यालयातील बीएड् अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक शुल्कात सुधारणा करण्यात येणार आहे. त्यासाठी मुळचे अकोल्याचे प्राचार्य डॉ. एस.जी. बुटे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. अलिकडच्या काही वर्षांमध्ये बीएड् अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे मोठय़ा संख्येने बीएड्च्या जागा रिक्त राहतात. या पृष्ठभूमीवर राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने बी. एड् अभ्यासक्रमाच्या शिक्षण शुल्कात सुधारणा करण्याचा निर्णय १९ जानेवारी रोजी घेतला. शिक्षण शुल्काबाबत सांगोपाग चर्चा करून उच्च व तंत्रशिक्षण विभागाला राज्य शासनाकडे सुधारित शिक्षण शुल्काबाबत शिफारशी करावयाच्या आहेत. त्या अनुषंगाने कोल्हापूर येथील महाराणी ताराबाई शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य, मुळचे अकोल्याचे डॉ. एस.जी. बुटे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे. या समितीमध्ये कोकण विभागातून पनवेल येथील उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. रमा भोसले आणि मुंबई येथील शिक्षण शुल्क समितीचे सहसंचालक डॉ. सुशीलकुमार चौधरी यांचा समावेश आहे.

Web Title: Beed Improvement in education fees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.