महिला आंदोलकांची समजूत काढण्यासाठी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर झाडावर चढले, मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 04:48 PM2022-01-26T16:48:33+5:302022-01-26T16:53:14+5:30

बीडमध्ये झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादिवशी नगर परिषदेच्या कंत्राटी महिला कामगार जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषणाला बसल्या होत्या.

Beed NCP MLA Sandeep Kshirsagar climbed a tree to get the understanding of women agitators | महिला आंदोलकांची समजूत काढण्यासाठी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर झाडावर चढले, मग...

महिला आंदोलकांची समजूत काढण्यासाठी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर झाडावर चढले, मग...

googlenewsNext

बीड – भारताच्या प्रजासत्ताक दिनी देशभरात सगळीकडे जल्लोषाचं आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. त्यात बीड जिल्ह्यात हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी महिला आंदोलकाला झाडावरुन उतरवण्यासाठी आमदाराला सीढीवर चढावं लागलं. सोशल मीडियात या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जिल्ह्यात या प्रकाराची सगळीकडे चर्चा सुरु आहे.  

बीडमध्ये झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादिवशी नगर परिषदेच्या कंत्राटी महिला कामगार जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषणाला बसल्या होत्या. मागील अनेक वर्षांपासून नुसते आश्वासन देऊन या महिला कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी कामगार म्हणून घेतले नाही. नगर पालिकेच्या गलथान कारभाराला कंटाळून आज दोन महिला कामगार चक्क लिंबाच्या झाडावर चढवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होत्या.

त्यावेळी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर उपस्थित होते. त्यांनी महिला आंदोलकांचा प्रकार पाहून स्वत: सीढी लावत झाडावर चढले. मी लोकप्रतिनिधी या नात्याने आपले प्रश्न सोडवण्यासाठी कायम तत्पर आहे. झाडावर चढून आत्महत्या करणे पर्याय नाही, असे सांगून स्वतः याप्रकरणी लक्ष देईल असा विश्वास आमदार संदीप क्षीरसागर यांनी महिला कर्मचारी, कामगारांना दिला व झाडावरून खाली येण्यासाठी विनंती केली. या प्रकरणी पुढील काळात पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनातून हा प्रश्न नक्कीच मार्गी लागलेला असेल हा माझा शब्द आहे असं आश्वासन त्यांनी दिले.

धारूर शहरातही आत्महत्येचा प्रयत्न

धारूर शहरातील मंडप व्यावसायिक पवन तट यांनी कोरोना काळात तहसीलदार यांच्या आदेशाने कोरोना सेंटरला रुग्णांसाठी बेड, बेडशीट व इतर साहित्य पुरवले होते. मात्र दोन वर्ष उलटूनही प्रशासनाने पवन तट यांचे बिल अदा केले नसल्यामुळे त्यांनी ध्वजारोहनानंतर थेट आत्मदहनाचा प्रयत्न केला. दरम्यान, आमदार प्रकाश सोंळके यांनी या तरूणाची भेट घेऊन तात्काळ बिल काढण्याच्या सूचना दिल्या.

वेळेची पर्वा न करता साहित्य प्रशासनाला पुरविण्याचे काम पवन तट यांनी केलेले आहे. मात्र या दिलेल्या साहित्याचे देयक वारंवार तहसीलदार यांना मागणी करून मिळत नसल्याने पवन तट यांनी टोकाची भूमिका घेतली.  हे बिल मिळवण्यासाठी आत्मदहन करण्याचा इशारा मंडप व्यावसायिक पवन तट यांनी निवेदनाद्वारे दिला होता.

Web Title: Beed NCP MLA Sandeep Kshirsagar climbed a tree to get the understanding of women agitators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.