बीड - शेतात काम करणाऱ्या महिलेवर बलात्कार
By admin | Published: August 21, 2016 12:58 PM2016-08-21T12:58:03+5:302016-08-21T12:58:03+5:30
शेतात काम करणाऱ्या एकट्या महिलेला गाठून गावातीलच नराधमाने तिच्यावर ेबलात्कार केला. ही घटना शनिवारी अंथरवणपिंप्री (ता. बीड) येथे दुपारी घडली.
ऑनलाइन लोकमत
बीड, दि. २१ : शेतात काम करणाऱ्या एकट्या महिलेला गाठून गावातीलच नराधमाने तिच्यावर ेबलात्कार केला. ही घटना शनिवारी अंथरवणपिंप्री (ता. बीड) येथे दुपारी घडली.
विजय रामभाऊ पवार (रा. अंथरवणपिंप्री) असे आरोपीचे नाव असून त्याला पिंपळनेर पोलिसांनी पहाटे तीन वाजता अटक केली. पीडित महिलेचे वय ३२ असून आरोपी २८ वर्षांचा आहे. तो देखील विवाहित आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिलेचा एक मुलगा आजारी होता. त्यामुळे तिचा पती उपचारासाठी त्याला घेऊन बाहेरगावी गेला होता. ती एकटीच शेतात कापूस खुरपणीचे काम करत होती. यावेळी गावातील विजय पवार हा तेथे आला. त्याने तिच्यावर बळजबरी केली. तिच्याशी कुकर्म करुन तो पसार झाला.
दरम्यान, रविवारी रात्री पीडित महिलेला त्रास होऊ लागला. ती पती, दोन मुले व सासऱ्यासोबत कशीबशी बीडला पोहोचली. पहाटे अडीच वाजता हे सर्वजण बसस्थानकापासून जिल्हा रुग्णालयाकडे पायी जात होते. यावेळी गस्तीवर असलेल्या उपअधीक्षक गणेश गावडे यांनी त्यांना पाहिले. त्यांनी चौकशी केली तेव्हा त्यांना संशय वाटला; परंतु गावडे यांनी त्यांना विश्वासात घेतले तेव्हा खरा प्रकार पुढे आला. मात्र, पीडित महिलेला आरोपीचे फक्त नाव माहीत होते, आडनाव सांगता येत नव्हते. ती प्रचंड भयभीत होती.
गावडे यांनी पिंपळनेर ठाण्याचे सहायक निरीक्षक गजानन जाधव यांना तेथे पाचारण केले. जाधव यांनी पीडित महिलेला वैद्यकीय चाचणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेले. त्यानंतर त्यांनी रातोरात तपासाची चक्रे गतिमान केली. आरोपी विजय पवारला त्याच्याच घरातील अंथरुणावरुन उचलले. त्याला दुपारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.