बीडमध्ये तरुणावर गोळीबार थोडक्यात बचावला, प्रसंगावधान राखल्याने 3 फायर चुकविले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2017 10:23 PM2017-10-01T22:23:54+5:302017-10-01T22:24:07+5:30

क्रिकेटचा सराव करुन मित्रासोबत घरी निघालेल्या तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी 4 फायर केले. तरुणाने प्रसंगावधान राखत 3 गोळ्या चुकविल्या तर 1 गोळी त्याच्या पोटाला चाटून गेली.

In Beed saved the firing in a short time, causing fire to 3 fire | बीडमध्ये तरुणावर गोळीबार थोडक्यात बचावला, प्रसंगावधान राखल्याने 3 फायर चुकविले

बीडमध्ये तरुणावर गोळीबार थोडक्यात बचावला, प्रसंगावधान राखल्याने 3 फायर चुकविले

Next

बीड : क्रिकेटचा सराव करुन मित्रासोबत घरी निघालेल्या तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी 4 फायर केले. तरुणाने प्रसंगावधान राखत 3 गोळ्या चुकविल्या तर 1 गोळी त्याच्या पोटाला चाटून गेली. यामध्ये जखमी झालेल्या तरुणाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी मोठा जमाव रुग्णालय परिसरात जमला होता. याठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त लावला होता.
शेख सर्फराज अब्दुल सलाम (वय ३६, रा.भालदारपुरा, बीड) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. सर्फराज हे नियमित जिल्हा क्रीडा संकुलात क्रिकेटचा सराव करण्यासाठी मित्रांसोबत येतात. रविवारीही त्याने सराव केला. ७ च्या सुमारास तो आपल्या दुचाकीवरुन (एमएच२३/३५५५) वरुन मित्र मोहसीन (मोमीनपुरा) सोबत घरी निघाला होता. सुभाष रोड, डॉ. आंबेडकर पुतळामार्गे चांदणी चौकात येताच अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर ४ फायर केले. परंतु सर्फराजने प्रसंगावधान राखून ३ गोळ्या चुकविल्या तर १ गोळी त्याच्या पोटाच्या डाव्या बाजूला चाटून गेली. यामध्ये जखमी झालेल्या सर्फराजला तात्काळ भाऊ शेख रियाज यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. ही माहिती वा-यासारखी पसरताच मित्र, नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली.
त्यामुळे याठिकाणी मोठा जमाव जमला होता. जमावाला पांगविण्यासाठी राज्य राखीव दलाचे जवान बोलाविण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल
झालेला नव्हता.  पोलीस अधिका-यांची धाव घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांनी रुग्णालयात धाव घेतली. सर्फराजसोबत असलेल्या मोहसीनकडून त्यांनी घटनेची माहिती घेतली.
त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनीही रुग्णालयात धाव घेत माहिती घेतली. शहर ठाण्याचे सय्यद सुलेमान हेही याठिकाणी बंदोबस्तासह हजर
झाले.  सर्फराज ३ मतांनी झाला होता पराभूत नगरपालिका निवडणुकीत सर्फराज शेख हा काकू-नाना आघाडीच्या वतीने प्रभाग क्र. १७ मध्ये उमेदवार होता. सय्यद सादेक उज्जमा यांच्याकडून त्याचा अवघ्या ३ मतांनी पराभव झाला होता. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात काकू-नाना आघाडीच्या पदाधिकाºयांसह कार्यकर्त्यांनी धाव घेतली होती.
कारण अस्पष्ट
सर्फराज याच्यावर राजकीय वादातून हल्ला झाला की, इतर कारण आहे? याबाबत
कुठलीही अधिकृत माहिती उशिरापर्यंत हाती लागली नाही. परंतु सर्फराजवर झालेल्या हल्ल्याबद्दल शहरात वेगवेगळ्या चर्चेला ऊत आला होता.
गोळीबाराची दुसरी घटना-
काही दिवसांपूर्वीच अंकुशनगर भागात दोन गटातील वादातून गोळीबार झाल्याची
घटना घडली होती. आता पुन्हा ही घटना घडल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. हे रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
 

Web Title: In Beed saved the firing in a short time, causing fire to 3 fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.