बीड सेक्स रॅकेट; मामा-भाच्याने केला ५० मुलींचा ‘सौदा’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 03:15 AM2017-10-03T03:15:40+5:302017-10-03T03:15:53+5:30

बीडमधील सेक्स रॅकेटची व्याप्ती वाढत असून या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या मामा-भाच्याने आतापर्यंत ५० पेक्षा जास्त मुलींचा ‘सौदा’ केल्याचे उघडकीस आले आहे.

Beed sex racket; Mama-Bhabna's 50 girls deal '? | बीड सेक्स रॅकेट; मामा-भाच्याने केला ५० मुलींचा ‘सौदा’?

बीड सेक्स रॅकेट; मामा-भाच्याने केला ५० मुलींचा ‘सौदा’?

googlenewsNext

बीड : बीडमधील सेक्स रॅकेटची व्याप्ती वाढत असून या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या मामा-भाच्याने आतापर्यंत ५० पेक्षा जास्त मुलींचा ‘सौदा’ केल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्या मोबाइलमध्ये तसे फोटोही आढळल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
पश्चिम बंगालहून कामासाठी ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे आलेल्या अल्पवयीन विवाहितेची फसवणूक करीत तजुमल शेख (भाचा) व युनूस शेख (मामा) यांनी तिची बीडमध्ये शशिकला व सविता आंटीला विक्री केली होती.
शिवाजीनगर पोलिसांनी शिताफीने या दोघांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
युनूस शेख व तजुमल शेख यांच्याकडून एक मोबाइल हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये ५० पेक्षा जास्त मुलींचे फोटो आढळले. हे सर्व फोटो व्हॉट्सअ‍ॅपवरून वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकांवर पाठविण्यात आल्याचे सूत्रांकडून कळले.

मुलीचा फोटो दाखविताच
पाठविले पैसे
युनूस व तजुमल याच्या मोबाइलमध्ये ‘बीड’ नावाने एक क्रमांक सेव्ह आहे. या मोबाइल क्रमांकावर मामा-भाचाने अनेक मुलींचे फोटो पाठविले आहेत. फोटो पाठविताच बीडमधून वेगवेगळ्या बँकेतून युनूसच्या बॅँक खात्यावर पैसे पाठविण्यात आले आहेत. पुरावा म्हणून त्याची पावतीही व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविलेली आहे.

बीड ते कल्याण
रॅकेट सक्रिय
अनेक महिन्यांपासून बीड व अन्य जिल्ह्यात मुलींची विक्री झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. देहविक्री करणाºया रॅकेटचे कनेक्शन बीड ते कल्याण असल्याचा अंदाज आहे. पोलिसांकडून याचा छडा लावण्याचे काम सुरू असून लवकरच याचा उलगडा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Beed sex racket; Mama-Bhabna's 50 girls deal '?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा