राज्यात भिकारीमुक्त मोहीम: स्वयंसेवी संस्थांची मदत घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 02:52 AM2017-10-09T02:52:51+5:302017-10-09T02:53:38+5:30
राज्यात भिका-यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालली असून याकडे एक सामाजिक समस्या म्हणून पाहत राज्याच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयाने संपूर्ण महाराष्ट्रात ‘भिकारीमुक्त मोहीम’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
राहुल शिंदे
पुणे : राज्यात भिका-यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालली असून याकडे एक सामाजिक समस्या म्हणून पाहत राज्याच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयाने संपूर्ण महाराष्ट्रात ‘भिकारीमुक्त मोहीम’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्यातील स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.
उपजीविकेसाठी स्थलांतर, शारीरिक विकलांगता, कुटुंबापासून बेघर होणे यासंह अनेक कारणांमुळे शहरांमध्ये भिकाºयांची संख्या वाढत आहे. ‘भिकारीमुक्त महाराष्ट्र’ ही कल्पना सत्यात उतविणे आवघड आहे. परंतु, पुण्यात धर्मादाय आयुक्त म्हणून काम करत असताना सध्याचे राज्य आयुक्त शिवकुमार डिगे यांनी २०१५ मध्ये ‘भिकारीमुक्त पुणे’ ही कल्पना मांडली होती. पुण्यातील २० ते २५ संस्थांनी ही मोहिम राबविण्यासाठी पुढाकार घेतला होता. भिकाºयांना रोजगारासह मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. काही संस्था भिकाºयांसाठी काम करतात. मात्र, राज्याच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयानेच महाराष्ट्रात भिकारी मुक्त मोहिम राबविण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना पाठबळ मिळणार आहे.
पुण्यात जनसेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून भिकाºयांच्या मुलांसाठी गेल्या काही वर्षांपासून काम केले जात आहे. सुमारे दीड हजार मुलांच्या शिक्षणाची व आरोग्याची काळजी घेण्याचे काम फाऊंडेशन करत आहे. डिगे यांनी मांडलेल्या कल्पनेनुसार जनसेवा फाऊंडेशनने विविध भागातील भिकाºयांचा शोध घेतला. लहान मुलांना दररोज शाळेत पाठवून त्यांच्यात सुधारणा करण्याबाबत एक यंत्रणा तयार केली. त्यामुळे भीक मागणाºया मुलांना शिक्षणाची दारे खुली झाली आहेत.
जनसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. विनोद शहा म्हणाले, लिंबू- मिरचीचा किंवा डोंबाºयाचा खेळ करून उपजीविका करणाºया पालकांचे समुपदेशन करणे हे मोठे आव्हान आहे. संस्थेकडून ५० मुलांच्या मागे एक शिक्षक आणि २५० मुलांच्या मागे एक एमएसडब्ल्यू अधिकारी, अशी यंत्रणा काम करत आहे. सध्या १ हजार २०० मुले पालिकेच्या शाळेत तर ३०० मुले खासगी शाळेत शिक्षण घेत आहेत.