SSC Exam : दहावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात; यंदाही हॉल तिकीट ऑनलाइन उपलब्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 12:01 PM2020-03-02T12:01:17+5:302020-03-02T12:07:26+5:30
SSC Exam : यंदा राज्यभरातून १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला उद्यापासून ( दि.३ मार्च) सुरुवात होत आहे. यंदा ३ मार्च ते २३ मार्च २०२० या कालावधीत परीक्षा होणार असल्याची माहिती अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली.
यंदा राज्यभरातून १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थी देणार आहेत. यात ९ लाख ७५ हजार ८९४ विद्यार्थी तर ७ लाख ८९ हजार ८९८ विद्यार्थिनींचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 65 हजार परीक्षार्थी वाढ आहेत.80 उपद्रवी केंद्र असून नाशिक विभागात सर्वाधिक आहेत.यंदाही ऑनलाइन हॉल तिकीट उपलब्ध करून दिल्याचे मंडळाने स्पष्ट केले.
परीक्षेत कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून राज्यभरात मिळून २७३ भरारी पथके नेमण्यात आली आहेत.ही पथके 'गैरमागार्शी लढा' या नावाने काम करणार आहेत. यामध्ये महिलांचे एक विशेष पथक काम करणार आहे. याशिवाय प्रत्येक विभागीय मंडळात हेल्पलाईन तयार करण्यात आल्या असून,विद्यार्थ्यांना, पालकांना येणा?्या अडचणींवर त्यावर २४ तास मार्गदर्शन करण्यात येईल.
यावेळी विद्यार्थ्यांनी पालन करायच्या सूचना खालीलप्रमाणे :
-4 हजार 979 परीक्षा केंद्र
-विद्यार्थ्यांनी परीक्षेला वेळेवर उपस्थित राहावे असे महामंडळाचे आवाहन
-बारावीप्रमाणे दहावीच्या प्रश्नपत्रिकाही सीलबंद पाकिटात येणार, विद्यार्थ्यांच्या सहीने उघडणार पाकीट.
- तोंडी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षा राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा 24 आणि 26 मार्च रोजी घेणार
- सकाळी पेपर असेल तर साडे दहा वाजता तर दुपारी पेपर पेपर असेल तर अडीच वाजता उपस्थितीत राहावे.
- उत्तरपत्रिका व पुरवण्यांची अदलाबदल होवू नये म्हणून सर्व पुरवण्या व उत्तरपत्रिकांवर बारकोडची छपाई