बारावीच्या पेपर तपासणीस सुरुवात
By admin | Published: March 2, 2016 03:02 AM2016-03-02T03:02:49+5:302016-03-02T03:02:49+5:30
बारावीच्या पेपर तपासणीबाबत कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी पुकारलेले असहकार आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : बारावीच्या पेपर तपासणीबाबत कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी पुकारलेले असहकार आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्याचे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिल्याने आंदोलन मागे घेण्याची घोषणा महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाने मंगळवारी केली आहे.
संघाच्या घोषणेमुळे बारावीचा निकालही वेळेत लागण्याची शक्यता आहे. आज शिक्षक आमदार रामनाथ मोते, कनिष्ठ महाविद्यालयीन महासंघाचे अनिल देशमुख व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यात प्रलंबित प्रश्नांवर चर्चा झाली. आयटी शिक्षकांना तातडीने मान्यता देण्यात येतील, पात्र कायम विना अनुदानित महाविद्यालयांना अनुदान दिले जाईल, २४ वर्षांच्या सेवेनंतर सर्वांना निवडश्रेणीचा लाभ मिळेल, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनीच पेन्शन योजना लागू करण्यात येईल, अशी सकारात्मक चर्चा झाल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.