गेल्या ७ वर्षातील सर्वात उशिरा मान्सूनच्या माघारीस सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 04:33 PM2017-09-27T16:33:34+5:302017-09-27T16:34:00+5:30

मान्सूनच्या परतीचा प्रवास बुधवारी सुरु झाला असून, आज मान्सून अमृतसर, हिस्सार, नालियामधून माघारी आला आहे़ दरवर्षी मॉन्सूनचा परतीचा प्रवास साधारण १ सप्टेंबर रोजी सुरु होतो. 

The beginning of the last 7 years of the late monsoon | गेल्या ७ वर्षातील सर्वात उशिरा मान्सूनच्या माघारीस सुरुवात

गेल्या ७ वर्षातील सर्वात उशिरा मान्सूनच्या माघारीस सुरुवात

Next

पुणे - मान्सूनच्या परतीचा प्रवास बुधवारी सुरु झाला असून, आज मान्सून अमृतसर, हिस्सार, नालियामधून माघारी आला आहे़ दरवर्षी मॉन्सूनचा परतीचा प्रवास साधारण १ सप्टेंबर रोजी सुरु होतो. यंदा मात्र, मॉन्सूनला सर्वाधिक काळ रेंगाळला असून गेल्या ७ वर्षात सर्वात उशिरा मॉन्सूनची माघारी जाण्यास सुरुवात होत आहे़ 

येत्या ७२ तासात मॉन्सून पंजाब, पश्चिम राजस्थान तसेच हरियाना, पूर्व राजस्थान, गुजरात आणि अरबी समुद्राचा काही भागातून माघारी येण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे़ 

साधारणपणे १ सप्टेंबरनंतर पश्चिम राजस्थान, पंजाबमधून मॉन्सूनच्या माघारीस सुरुवात होते आणि आॅक्टोंबरच्या अखेरीस संपूर्ण देशभरातून मॉन्सून परत गेलेला असतो़ 

१ सप्टेबरनंतर मॉन्सूनची माघारी सुरु झाली हे जाहीर करताना हवामान विभाग काही निकष पडताळून पहाते़ त्यात सलग ५ दिवस त्या त्या क्षेत्रातील पावसाचे कमी होत गेलेले प्रमाण, हवेतील आर्द्रता कमी होत जाते़ त्यानंतर त्या भागातून मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झाला असल्याचे समजले जाते़ गेल्या ७ वर्षात यापूर्वी सर्वात अगोदर ४ सप्टेंबर २०१५ रोजी मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झाला होता़ यंदा मॉन्सूनचा सर्वात उशिरा परतीचा प्रवास सुरु झाला आहे़

 

मान्सूनच्या परतीचा प्रवास 

वर्ष   परतीची सुरुवात   देशभरातून माघारी

२०१७  २७ सप्टेंबर     - 

२०१६  १५ सप्टेंबर   २८ आॅक्टोंबर

२०१५  ४ सप्टेंबर   १९ आॅक्टोंबर

२०१४  २३ सप्टेंबर  १८ आॅक्टोंबर

२०१३  ९ सप्टेंबर  २१ आॅक्टोंबर

२०१२  २४ सप्टेंबर  १८ आॅक्टोंबर

२०११  २३ सप्टेंबर  २४ आॅक्टोंबर

Web Title: The beginning of the last 7 years of the late monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.