तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यास सुरुवात

By admin | Published: June 27, 2016 03:41 PM2016-06-27T15:41:48+5:302016-06-27T20:45:34+5:30

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यास दुपारी अडीचला श्री श्रेत्र देहूगाव येथे सुरुवात झाली. आषाढी वारीसाठी पालखी सोहळा सायंकाळी पाचला पंढरीकडे पालखी मार्गस्थ होणार

The beginnings of Tukaram Maharaj's Palkhi Festival | तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यास सुरुवात

तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यास सुरुवात

Next

पिंपरी - संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यास दुपारी अडीचला श्री श्रेत्र देहूगाव येथे सुरुवात झाली.  आषाढी वारीसाठी पालखी सोहळा सायंकाळी पाचला पंढरीकडे पालखी मार्गस्थ होणार आहे. यंदाचा 331 वा सोहळा आहे. ३३0 दिंड्या सहभागी आहेत.

ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोष.... टाळ मृदंग गजराने देहूगाव नागरी भक्तीमय झाली आहे. सोहळ्यास अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री गिरीश बापट, पाणीपुरवठा मंत्री बबन लोणीकर, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, माजी मंत्री हर्ष वर्धन पाटील, देहू देवस्थान अध्यक्ष शांताराम मोरे उपस्थित आहेत, राज्यात पाऊस पडू दे तुकाराम महाराज चरणी अर्थमंत्री यांचे साकडं. तर देहूत हलक्या सरी पडण्यास सुरुवात झाली आहे.

 

Web Title: The beginnings of Tukaram Maharaj's Palkhi Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.