मोदींच्या मागे- पुढे कुणी नाही? आपण हे विसरलात...; फकीर, घराणेशाहीवर उद्धव ठाकरेंना बावनकुळेंचे प्रत्यूत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 11:10 PM2023-04-23T23:10:54+5:302023-04-23T23:11:52+5:30
घराणेशाहीवर तुम्ही बोलताय ना, मी फकीर आहे, असे सांगत आहेत. तुमच्या मागे पुढे कोणी नाही. अरे कधीतरी झोळी लटकवून निघून जाल, माझ्या जनतेच्या हाती कटोरा देऊन. म्हणून घराणे चांगले लागते, असा टोला ठाकरे यांनी मोदींना लगावला होता.
जळगावच्या पाचोऱ्यामध्ये आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत फकीर आणि घराणेशाही यावर भाष्य केले. आता याला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी प्रत्यूत्तर दिले आहे.
फकीर झोळी लटकवून निघून जाईल, जनतेच्या हाती कटोरा देईल; उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका
घराणेशाहीवर तुम्ही बोलताय ना, मी फकीर आहे, असे सांगत आहेत. तुमच्या मागे पुढे कोणी नाही. अरे कधीतरी झोळी लटकवून निघून जाल, माझ्या जनतेच्या हाती कटोरा देऊन. म्हणून घराणे चांगले लागते, असा टोला ठाकरे यांनी मोदींना लगावला होता. य़ावर बावनकुळेंनी ट्विट करून टीका केली आहे.
आपण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख केलात. “ मोदीच्या मागे- पुढे कुणी नाही ” असे म्हणालात, परंतू हे विसरलात की, त्यांच्यासोबत देशातील कोट्यवधी जनतेचे आशीर्वाद आहेत. हा देशच त्यांचे कुटुंब आहे. लहानपणीच कुटुंबाचा त्याग केलेल्या माणसाला कुटुंबाचा मोह कसा राहणार ? कुटुंबाच्या मोहात तर तुम्ही अडकला आहात. म्हणूनच तुमच्या जवळची माणसे सोडून गेली आणि तुमची ही गत झाली आहे, असा टोला बावनकुळेंनी लगावला आहे.
उद्धव ठाकरेंचीभाजपावर टीका...
लवकरच निवडणुका लागतील. या गद्दाराला गाडायचे आहे. मी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेलो तर म्हणे हिंदुत्व सोडले. मविआला तीन वर्षे झाली. कधी हिंदुत्व सोडले हे दाखवून द्या, मी आता हे व्यासपीठ सोडून जाईन. मुख्यमंत्री म्हणून मला शपथ घ्यावी लागली. आमदारांनाही घ्यावी लागते. हे लोक कोरोनात मंदिरे उघडा म्हणून थाळ्या आपटत बसले होते. मी हिंदुत्व सोडणार नाही, माझे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे नाही. भाजपाने त्यांचे हिंदुत्व कोणते ते सांगावे. त्याना आगापिछा काहीच नाही, अशी टीका ठाकरेंनी केली आहे.