‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे

By admin | Published: October 29, 2015 01:09 AM2015-10-29T01:09:03+5:302015-10-29T01:09:03+5:30

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयासमवेत बैठकांच्या फेऱ्या होऊनही काहीच निष्पन्न होत नसल्याने अखेर १३९ दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन मागे घेण्याची घोषणा फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन

Behind the movement of students of FTII | ‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे

‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे

Next

पुणे : केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयासमवेत बैठकांच्या फेऱ्या होऊनही काहीच निष्पन्न होत नसल्याने अखेर १३९ दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन मागे घेण्याची घोषणा फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या (एफटीआयआय) स्टुडंट असोसिएशनने बुधवारी पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे संस्थेतील शैक्षणिक वर्ग पुन्हा सुरू होणार आहेत. तथापि, आंदोलन मागे घेतले असले, तरी गजेंद्र चौहान यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी होईपर्यंत विरोध कायम
राहणार असल्याचेही संघटनेने म्हटले आहे. राकेश शुक्ला म्हणाला, की केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांसह राज्यमंत्री राजवर्धनसिंह राठोड यांच्याबरोबर झालेल्या सर्वच बैठका निष्फळ ठरल्या. (प्रतिनिधी)
एफटीआयआय नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची निवड योग्य नसल्याने त्यांना हटवावे, यासाठी १२ जूनपासून विद्यार्थ्यांनी बंद पुकारला होता.
गत १३९ दिवस विद्यार्थी वर्गात न जाता अहिंसक मार्गाने लढत होते.
आंदोलनाला राहुल गांधी, नगमा, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह अनेक राजकीय नेते व अभिनेत्यांनी भेटी देऊन समर्थन दिले. अनेक सेलिब्रिटींनी टिष्ट्वटरवर पाठिंबा दिला.
विद्यार्थ्यांवर ‘नक्षलवादी’ म्हणून आरोप झाले. संचालकांना घेराव घातल्याप्रकरणी विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करून मुलांना अटकही केली.
विद्यार्थ्यांनी १८ दिवस उपोषणदेखील केले.
विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी केंद्राने एस.एम. खान कमिटी गठित केली; मात्र समितीने विद्यार्थ्यांच्या विरोधातच कौल दिला.
केंद्रीय राज्यमंत्री, सचिव यांच्यासोबत विविध बैठका, पण तोडगा नाही.
माझे काम आणि सकारात्मकतेने मने जिंकणार -चौहान
आपले काम आणि सकारात्मक दृष्टिकोन या माध्यमातून विद्यार्थ्यांची मने जिंकण्यावर आपला भर असेल, असे सांगून एफटीआयआयचे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांनी १३९ दिवसांचा संप मागे घेण्याच्या संस्थेतील विद्यार्थ्यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Web Title: Behind the movement of students of FTII

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.