खटल्यातून अशोक चव्हाणांचे नाव मागे
By admin | Published: August 8, 2014 01:52 AM2014-08-08T01:52:33+5:302014-08-08T01:52:33+5:30
माजी मुख्यमंत्री, खासदार अशोक चव्हाण यांच्याविरोधातील आदर्श सोसायटी इमारत घोटाळा खटल्याच्या कामकाजास उच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली़
Next
>मुंबई : माजी मुख्यमंत्री, खासदार अशोक चव्हाण यांच्याविरोधातील आदर्श सोसायटी इमारत घोटाळा खटल्याच्या कामकाजास उच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली़ त्यामुळे तूर्तास तरी खासदार चव्हाण यांना बाजूला ठेवून सीबीआयला यातील इतर आरोपींविरोधात खटला सुरू करता येईल़
न्या़ साधना जाधव यांच्या खंडपीठाने ही स्थगिती दिली़ तसेच चव्हाण यांना तूर्त वगळून खटल्याचे कामकाज चालू शकते, असे मतही न्या़ जाधव यांनी या वेळी व्यक्त केल़े
या प्रकरणी सीबीआयने अपील याचिका दाखल केली होती़ या घोटाळ्यात चव्हाण यांच्याविरोधात फसवणूक, कट रचणो, पदाचा गैर वापर करणो यासह भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आरोप ठेवण्यात आला आह़े त्यांच्याविरोधात खटला चालवण्यासाठी राज्यपाल यांची परवानगी आवश्यक असल्याने तसा अजर्देखील सीबीआयने केला होता़ मात्र राज्यपाल यांनी चव्हाण यांच्याविरोधात खटला चालवण्यास परवानगी दिली नाही़
त्यानुसार सीबीआयने विशेष न्यायालयात चव्हाण यांचे नाव या खटल्यातून वगळण्यासाठी अर्ज केला़ तो न्यायालयाने फेटाळून लावला़ याविरोधात सीबीआयने उच्च न्यायालयात अपील याचिका दाखल केली़ चव्हाण यांच्याविरोधात खटला चालवण्यास राज्यपाल यांनी परवानगी नाकारली आह़े त्यामुळे त्यांच्याविरोधात खटला चालवू शकत नाही़ तेव्हा या खटल्यातून चव्हाण यांचे नाव वगळण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी सीबीआयने याचिकेत केली आह़े त्याची दखल घेत न्यायालयाने चव्हाण यांच्याविरोधातील खटल्यास स्थगिती दिली़ आता या याचिकेवर पुढील सुनावणी होणार आह़े (प्रतिनिधी)