बेळगावसह कारवार सीमाभाग केंद्रशासित करा

By admin | Published: August 14, 2014 03:25 AM2014-08-14T03:25:18+5:302014-08-14T03:25:18+5:30

मराठी भाषेला कर्नाटकात कधीच सन्मान मिळणार नाही. यासाठी बेळगावसह मराठी भाषक सीमा भाग केंद्रशासित प्रदेश झाला पाहिजे,

Belgaum with Caravans border union | बेळगावसह कारवार सीमाभाग केंद्रशासित करा

बेळगावसह कारवार सीमाभाग केंद्रशासित करा

Next

कोल्हापूर : मराठी भाषेला कर्नाटकात कधीच सन्मान मिळणार नाही. यासाठी बेळगावसह मराठी भाषक सीमा भाग केंद्रशासित प्रदेश झाला पाहिजे, अशी आग्रही मागणी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.
यावेळी साहित्यिक, नाट्य-चित्रपट कलावंतांनी येळ्ळूर येथील मराठी भाषिकांवर कर्नाटक पोलिसांकडून झालेल्या लाठी हल्लयाचा निषेध केला. याबाबतचा ठराव करुन तो लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्याचा निर्णय यावेळी झाला.
माधवी वैद्य म्हणाल्या, मराठी भाषेला, मराठी माणसाला आंदोलन करावे लागत आहे, ही खेदाची बाब आहे. सीमा प्रश्नी आंदोलनात मराठी बेळगुंदी येथे तीन जणांना हौतात्म्य पत्करावे लागले. लवकरच मराठी साहित्य महामंडळाची शाखा बेळगावात सुरु करण्याचा प्रयत्न असल्याचे वैद्य यांनी सांगितले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे (बेळगाव) अशोक याळगी यांनी गेली ६० वर्षे आमचे सीमाप्रश्नी आंदोलन सुरु असल्याचे सांगितले.
कन्नड भाषेसाठी तेथील सर्व साहित्यिक एकत्र येतात. परंतु सीमा भागातील मराठी भाषकांसाठी महाराष्ट्रातील साहित्यिक का एकत्र येत नाहीत, असा सवाल करत आता सर्व साहित्यिक व कलावंत पुढे आले आहेत. ही बाब स्वागतार्ह असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी कर्नाटक शासनातर्फे न परवडणारा जिझिया कर नाट्य संस्थांच्या गाड्यांना लावला जातो. त्यामुळे बेळगावात महाराष्ट्रातील सांस्कृतिक कार्यक्रमांची देवाण-घेवाण करता येत नाही. यामुळे भविष्यात मराठी भाषिकांवर अन्याय झाल्यास महाराष्ट्रातील सर्व विचारवंत, साहित्यिक, रंगकर्मी, तंत्रज्ञ एकत्र येऊन आंदोलन करतील, असे ही त्या म्हणाल्या.0
नाट्य परिषद (बेळगाव)च्या वीणा लोकूर म्हणाल्या, बेळगावमध्ये सर्रास कानडीकरण सुरु आहे. त्याला विरोध करण्याचे काम सुरु आहे. भविष्यात या ठिकाणी नाट्य संमेलन घेण्याचा प्रयत्न असल्याचे लोकूर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Belgaum with Caravans border union

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.