ग्रामसभा ठरविणार योजनेचे लाभार्थी
By admin | Published: June 14, 2016 02:53 AM2016-06-14T02:53:07+5:302016-06-14T02:53:07+5:30
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या (ग्रामीण) लाभार्थ्यांची निवड ग्रामसभेतच करण्यात येणार आहेत. यामुळे लाभार्थ्यांची निवड पारदर्शीपणे होणार असल्याची अपेक्षा जाणकारांनी वर्तविली आहे
- दिगांबर जवादे, गडचिरोली
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या (ग्रामीण) लाभार्थ्यांची निवड ग्रामसभेतच करण्यात येणार आहेत. यामुळे लाभार्थ्यांची निवड पारदर्शीपणे होणार असल्याची अपेक्षा जाणकारांनी वर्तविली आहे.
देशातील प्रत्येक कुटुंबाला २०२२ पर्यंत स्वत:चे घर उपलब्ध व्हावे, या उद्देशाने केंद्राने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व शहर अशा दोन योजना सुरू केल्या आहेत. ग्रामीण आवास योजनेंतर्गत २०१६-१७ ते २०१८-१९ या तीन वर्षांच्या कालावधीत १ कोटी घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या योजनेच्या लाभार्थ्यांची निवड २०११ च्या आर्थिक व सामाजिक जनगणनेतून करण्यात आली आहे. मात्र वास्तवात त्यांच्याकडे घर आहे किंवा नाही, याची पडताळणी करण्याची जबाबदारी ग्रामसभेवर सोपविली आहे.
महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातील दोन तालुक्यांमधील १० ग्रामपंचायतींची निवड या योजनेसाठी झाली आहे. यासंबधीचे प्रशिक्षण निवडक ग्रामसेवकांना नागपूर येथे देण्यात आले.