सावकारी कर्जमाफीचा फायदा ४५ हजार शेतकऱ्यांना; विदर्भ, मराठवाड्याला लाभ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 02:58 AM2019-09-11T02:58:06+5:302019-09-11T06:29:28+5:30
५५ कोटी कर्ज, २० कोटी व्याज माफ होणार
सोपान पांढरीपांडे
नागपूर : राज्य सरकारने सोमवारी जाहीर केलेल्या सावकारी कर्जमाफीचा फायदा विदर्भ व मराठवाड्यातील अंदाजे ४५,००० शेतकऱ्यांना होणार आहे व त्यांचे अंदाजे ५५ कोटी कर्ज व त्यावरील २० कोटी व्याज माफ होणार आहे.
सरकारने एप्रिल २०१५ मध्ये परवानाधारक सावकारांकडून शेतकºयांनी घेतलेली कर्जे माफ करण्याचे ठरवले होते. त्यानुसार विदर्भ व मराठवाड्यातील १९ जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली कर्जमाफी समित्या तयार झाल्या होत्या.
या समित्यांनी परवानाधारक सावकारांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील कर्ज माफ करण्याचे ठरविले. त्यानुसार ३१ मार्च २०१८ पर्यंत ४६,७३५ शेतकºयांचे ५५.९६ कोटी कर्ज व त्यावरील १०.५९ कोटी व्याज माफ झाले होते. परंतु परवानाधारक सावकारांनी कार्यक्षेत्राबाहेर दिलेले कर्ज माफीसाठी अपात्र ठरले होते. बºयाच वेळा शेतकरी गावातल्या सावकाराने कर्ज नाकारले तर शेजारच्या गावातील सावकारांकडून कर्ज घेतात किंवा शहरातीलच दुसºया भागातील सावकारांकडून कर्ज घेतात.
पूर्व नागपूरमधील शेतकºयाने पश्चिम नागपूरमधील सावकारांकडून कर्ज काढले तर ते कार्यक्षेत्राबाहेरचे कर्ज ठरून १० एप्रिल २०१५ च्या शासन निर्णयानुसार कर्ज माफीसाठी अपात्र ठरत होते, अशी माहिती वर्धेचे जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे यांनी दिली.
सरकारने दिले होते दुरुस्तीचे आश्वासन
विदर्भ व मराठवाड्यात अशा शेतकºयांची संख्या अंदाजे ४५००० आहे व ते सर्व २०१५ च्या निर्णयानुसार अपात्र ठरले होते. या शेतकºयांच्या वतीने शासन निर्णयाला कोर्टात आव्हान दिले तेव्हा राज्य शासनाने त्या निर्णयात दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले होते, अशीही माहिती वालदे यांनी दिली.