आॅनलाइन विद्यापीठाद्वारे बोगस पदव्यांची खैरात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 05:43 AM2018-03-31T05:43:11+5:302018-03-31T05:43:11+5:30

आयनॉक्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी नावाने आॅनलाइन बोगस विद्यापीठ स्थापन करून ‘वाजवी दरात’ पीएच.डी.पासून हवी ती पदवी देण्याचा गोरखधंदा उघड झाला आहे

Benefits of Bondus Degrees by Online University! | आॅनलाइन विद्यापीठाद्वारे बोगस पदव्यांची खैरात!

आॅनलाइन विद्यापीठाद्वारे बोगस पदव्यांची खैरात!

Next

साहिल शहा 
कोरेगाव (जि. सातारा) : आयनॉक्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी नावाने आॅनलाइन बोगस विद्यापीठ स्थापन करून ‘वाजवी दरात’ पीएच.डी.पासून हवी ती पदवी देण्याचा गोरखधंदा उघड झाला आहे. सामाजिक, राजकीय क्षेत्रातील बड्या हस्तींनी या खैरातीचा लाभ घेत बोगस पदव्या घेतल्या आहेत.
हा सर्व फंडा राबवणारा तथाकथित कुलपती डॉ. विठ्ठल श्रीरंग मदने (५० रा. कोरेगाव, जि. सातारा) याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
कोरेगावसारख्या छोट्या शहरांत १० बाय १०च्या खोलीत इंटरनेटद्वारे आयनॉक्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी चालविली जात होती. मदने हा स्वत: अल्पशिक्षित असून त्यानेही विविध संस्था व विद्यापीठांकडून अनेक बोगस पदव्या घेतल्या होत्या. पीएच.डी. केल्याची बतावणीही तो करीत होता. त्याच्या या आॅनलाइन बोगस कामाचा पसारा पाहून तपास यंत्रणादेखील चक्रावून गेली आहे.
स्वत:कडे एकही कागद न ठेवता सर्वच कामकाज आॅनलाइन पद्धतीने केल्याने तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली
आहे.
मदने हा स्वत: कुलपती बनून २८० प्रकारच्या बोगस पदव्यांचे वाटप करीत होता. खैरात केलेल्या पदव्यांमध्ये सर्वाधिक पदव्या या ‘डॉक्टर इन फिलॉसॉफी’च्या (पीएच.डी. व मानद पीएच.डी.) आहेत. त्यांची संख्या जवळपास १९४ एवढी आहे. त्याखालोखाल डॉक्टर इन लिटलेचर (डीलिट)चा क्रमांक लागत असून, त्याची संख्या ८६ एवढी आहे.
पदव्यांच्या लाभार्थ्यांची यादी त्याने बेवसाईटवरूनच पोलिसांना काढून दिली आहे. या लाभार्थ्यांची केवळ नावे असून, त्यांचे पत्ते नसल्याने तपासात अडचणी येत आहेत.

मदने याने बेवसाईटवर स्वत:च्या नावापुढे कुलपती ही पदवी लावून, मोबाइल क्रमांकदेखील दिला होता. त्याद्वारे लोकांनी संपर्क साधल्यावर बेवसाईटवर असलेल्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास तो सांगत होता. एका पदवीसाठी कमीतकमी ५० हजारांचा दर सांगितला जायचा. पदवीदान सोहळ्यात व्यक्तींसोबत येणाऱ्या इतरांकडून मात्र मिळेल ती रक्कम खिशात टाकून तो पदव्या द्यायचा.

बड्या हॉटेलांमध्ये
पदवीदान सोहळा
साताºयातील प्रसिद्ध हॉटेलच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये होणाºया पदवीदान सोहळ्यांना तो संबंधितांना बोलावून घ्यायचा. एकाच हॉटेलवर भर न देता, वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी वेगवेगळी हॉटेल्स बुक केली जात होती.

 

Web Title: Benefits of Bondus Degrees by Online University!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.