‘बंगाली’ मुखवट्यांची भुरळ!

By admin | Published: February 17, 2016 03:15 AM2016-02-17T03:15:50+5:302016-02-17T03:15:50+5:30

वांद्रे-कुर्ला संकुल येथे सुरू असलेल्या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाच्या कार्यक्रमात विविध संस्कृतींचे दर्शन घडविणारी दालने उभारण्यात आली असून, पश्चिम बंगालमधील कलाकारांनी

'Bengali' entanglement! | ‘बंगाली’ मुखवट्यांची भुरळ!

‘बंगाली’ मुखवट्यांची भुरळ!

Next

मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुल येथे सुरू असलेल्या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाच्या कार्यक्रमात विविध संस्कृतींचे दर्शन घडविणारी दालने उभारण्यात आली असून, पश्चिम बंगालमधील कलाकारांनी येथे साकारलेले मुखवटे प्रेक्षक वर्गाचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत.
पश्चिम बंगालमधील पुरालिया तालुक्यातील चौडीदार गावातील तीन कलाकारांनी ‘मेक इन इंडिया’ सप्ताहात मुखवट्यांचे दालन उभारले आहे. दालानाचे नेतृत्व दिलीप महातो करत असून, उर्वरित दोन कलाकरांनी साकारलेले रंगीबेरंगी मुखवटे प्रेक्षकांना आकर्षित करत आहेत. चौडीदार गाव हे मुखवटे साकारण्यासाठी ओळखले जाते. येथील ३०० कुटुंबे या व्यवसायावर उदरनिर्वाह चालवत आहेत. माती, कागद आणि टाकाऊ साहित्यापासून देवीदेवतांसह दानवाचे मुखवटे कलाकारांकडून साकारले जात आहेत, असे महातो यांनी सांगितले.
चौडीदार गावच्या या मुखवट्यांना दिल्लीसह अनेक प्रमुख शहरांमध्ये, तसेच परदेशातही मोठी मागणी आहे. कोलकात्यामध्ये मुखवट्यांना सर्वाधिक मागणी असून, पश्चिम बंगालमधील ‘छाऊ’ या सांस्कृतिक नृत्यांमध्ये या देवी-दानवांच्या मुखवट्यांचा प्राधान्याने वापर केला जातो. संगीत नाटक अकादमीच्या मदतीने या कलाकारांनी पश्चिम बंगालबाहेर पाय रोवले असून, आता सरकारने त्यांना आर्थिक मदत केली तर ही कला आणखी बहरेल, असे या कलाकारांचे म्हणणे आहे.

Web Title: 'Bengali' entanglement!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.