बेस्ट अ‍ॅप सेवा लवकरच

By admin | Published: August 7, 2016 12:12 AM2016-08-07T00:12:33+5:302016-08-07T00:12:33+5:30

प्रवाशांअभावी कमी केलेल्या बस फेऱ्या आणि वाहतुककोंडीमुळे बेस्ट बसगाड्यांना लेटमार्क लागत आहे़ यामुळे बेस्टवरच अवलंबून असलेल्या प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे़ यामुळे प्रवाशांची

Best App Service Soon | बेस्ट अ‍ॅप सेवा लवकरच

बेस्ट अ‍ॅप सेवा लवकरच

Next

मुंबई : प्रवाशांअभावी कमी केलेल्या बस फेऱ्या आणि वाहतुककोंडीमुळे बेस्ट बसगाड्यांना लेटमार्क लागत आहे़ यामुळे बेस्टवरच अवलंबून असलेल्या प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे़ यामुळे प्रवाशांची संख्या आणखी घटण्याची चिन्हे असल्याने जाग आलेल्या बेस्ट प्रशासनाने नवीन अ‍ॅप आणले आहे़ या अ‍ॅपमुळे बसगाडी कुठे पोहोचली आहे, त्यात किती प्रवासी आहेत़ कोणत्या मार्गावरील गाडी रद्द करण्यात आली? अशी सर्व माहिती मिळणार आहे़
बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने कमी झाली आहे़ प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी बेस्टने विविध योजना अणल्या़ तरी बसगाड्याच आॅनटाइम येत नसल्याने या योजना फोल ठरत आहे़ त्यामुळे बसथांब्यावर तातकळणाऱ्या प्रवाशांना आता बसबाबत सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे़ यासाठी बेस्टच्या सर्व बसगाड्यांमध्ये जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे़
ओला आणि उबर या अ‍ॅपवर आधारित टॅक्सीची स्पर्धा वाढल्यामुळे बेस्टनेही हायटेक मार्ग अवलंबिला आहे़ पुढच्या आठवड्यात हा अ‍ॅप सुरु होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे़ त्यामुळे प्रवाशांना इच्छित बस कोणत्या वेळेत बस थांब्यावर पोहोचेल, याची माहिती मिळू शकेल.

Web Title: Best App Service Soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.