‘बेस्ट सिटी’ होणार ‘एलईडी’ शहर

By admin | Published: November 8, 2016 01:40 AM2016-11-08T01:40:01+5:302016-11-08T01:40:01+5:30

बेस्ट सिटी, स्वच्छ सिटीनंतर पिंपरी-चिंचवड शहराची ओळख आता एलईडी दिव्यांचे शहर अशी होणार आहे. ऊर्जाबचतीसाठी एलईडी शहर करण्याचा संकल्प महापालिकेने सोडला आहे

'Best City' to be 'LED' city | ‘बेस्ट सिटी’ होणार ‘एलईडी’ शहर

‘बेस्ट सिटी’ होणार ‘एलईडी’ शहर

Next

विश्वास मोरे , पिंपरी
बेस्ट सिटी, स्वच्छ सिटीनंतर पिंपरी-चिंचवड शहराची ओळख आता एलईडी दिव्यांचे शहर अशी होणार आहे. ऊर्जाबचतीसाठी एलईडी शहर करण्याचा संकल्प महापालिकेने सोडला आहे. येत्या तीन वर्षांत हा संकल्प पूर्ण करण्यासाठी वाटचाल सुरू आहे. त्यातून ३० टक्के वीजबचत होईल, असा अंदाज महापालिकेने व्यक्त केला आहे.
शहरातील प्रमुख रस्ते, चौक, उद्याने, रुग्णालये येथील पथदिव्यांवर वर्षाला २२ कोटी रुपये वीजबिलापोटी खर्च होतात. त्यातच महावितरणचे दर हे वाढणारे असल्याने, तसेच समाविष्ट गावांतही मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे. नव्याने विकसित झालेल्या मार्गावर पथदिवे बसविण्यात येत आहेत.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वीज बचतीचा प्रयत्न सुरू केला आहे. एलईडी दिव्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वीज बचत होते. त्यामुळे एलईडीचे शहर करण्याचा प्रयत्न आहे. त्यातून वीज बचत होण्यासाठी मदत होणार आहे. तीस टक्के वीज बचत होणार आहे. येत्या तीन वर्षांत हा संकल्प पूर्ण होईल. त्यातून बेस्ट सिटी, स्वच्छ शहर आणि आता एलईडीचे शहर अशी ओळख निर्माण होणार आहे.
- प्रवीण तुपे, सह शहर अभियंता

रिअल टाइम क्लॉक
सायंकाळी सहाला सुरू झालेले पथदिवे पहाटे सहापर्यंत सुरू असतात. रात्रभर या दिव्यांचा एकसारखाच प्रकाश असतो. वीज बचतीसाठी रिअल टाइम क्लॉक ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. सायंकाळी सहाला १०० वॉटचा दिवा सुरू होतो. मध्यरात्री १२ ते सकाळी सहा या वेळेत या दिव्याच्या वीज वापरात ५० टक्के बचत होणार आहे, अशी व्यवस्था रिअल टाइम क्लॉकमध्ये केली आहे. तसेच दिवे दुरुस्तीच्या वेळी १०० टक्के वीज वापर होत असे. त्यात आता ७५ टक्के बचत होणार आहे.

Web Title: 'Best City' to be 'LED' city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.