लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत एकनाथ शिंदे पिछाडीवर; ९८.१ टक्के लोकांनी केले नापसंद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 02:45 PM2024-02-11T14:45:58+5:302024-02-11T14:49:20+5:30
Is Eknath Shinde Populer in Maharashtra? देशातली विविध राज्यांपैकी त्या त्या राज्यात कोणते मुख्यमंत्री सर्वाधिक पसंतीचे आहेत, याचीही आकडेवारी इंडिया टुडेच्या मूड ऑफ द नेशनमध्ये देण्यात आली होती.
आज जर लोकसभा निवडणूक झाली तर भाजप प्रणित एनडीएला किती आणि इंडिया आघाडी व विरोधकांना किती जागा मिळणार याचे दोन दिवसांपूर्वीच ओपिनिअन पोल आले होते. यातच देशातली विविध राज्यांपैकी त्या त्या राज्यात कोणते मुख्यमंत्री सर्वाधिक पसंतीचे आहेत, याचीही आकडेवारी इंडिया टुडेच्या मूड ऑफ द नेशनमध्ये देण्यात आली होती. यामध्ये ओडिशाचे सीएम नवीन पटनायक यांना सर्वाधिक पसंती असल्याचे दिसत आहे. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांच्यासाठी धक्का देणारी आकडेवारी आली आहे.
नवीन पटनायक यांना 52.7 टक्के जनतेने पसंतीचे असल्याचे म्हटले आहे. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दुसऱ्या क्रमांकाचे लोकप्रिय मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांना 46.9% टक्के जनतेने पसंती दिली आहे. तिसऱ्या क्रमांकावर आसामचे हिमंत बिस्वा शर्मा 48.6 टक्के मते घेऊन आले आहेत. गुजरातचे सीएम 42.6 टक्के मतांसह चौथ्या क्रमांकावर आहेत.
अजित पवारांना सोबत घेऊनही भाजपला फायदा नाही? सी व्होटर सर्व्हेत महाराष्ट्रात मोठा 'गेम'
यानंतर त्रिपुराचे मानिक साहा, गोव्याचे प्रमोद सावंत, उत्तराखंडचे पुष्कर सिंह धामी, दिल्लीचे अरविंद केजरीवाल, तामिळनाडूचे एम के स्टॅलिन, पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांचा नंबर लागत आहे. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पहिल्या दहातही नंबर आलेला नाहीय.
हा नवा सर्व्हे वाचा... आज लोकसभा निवडणूक झाली तर...; आजतक-सीव्होटरचा दुसरा सर्व्हे, मोदी खरेच ३७०+
महाराष्ट्रात शिवसेना काबीज करत भाजपासोबत सत्ता स्थापन केलेले शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यात खूप मागे पडले आहेत. शिंदे यांना महाराष्ट्रातून अवघी १.९ टक्के लोकांचीच मते पडली आहेत. शिंदे यांची राज्यात पसंती खूपच कमी झाली आहे, हे यावरून दिसून येत आहे. या यादीत शिंदे यांचा शेवटून तिसरा क्रमांक लागत आहे.