बेस्टची वीज स्वस्त
By Admin | Published: October 30, 2016 12:50 AM2016-10-30T00:50:38+5:302016-10-30T00:50:38+5:30
मुंबई शहरात वीजपुरवठा करणाऱ्या बेस्टच्या वीजदरात महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने कपात केली आहे. बेस्टने दाखल केलेल्या वीजदरवाढीवर आयोगाने निर्णय दिला आहे.
मुंबई : मुंबई शहरात वीजपुरवठा करणाऱ्या बेस्टच्या वीजदरात महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने कपात केली आहे. बेस्टने दाखल केलेल्या वीजदरवाढीवर आयोगाने निर्णय दिला आहे. त्यानुसार, आयोगाने चालू आर्थिक वर्ष २०१६-१७ करिता सरासरी वीजदरात एकूण ७ टक्के कपात मंजूर केली आहे. सरासरी वीजदरात २०१७-१८ मध्ये ६ टक्के कपात, २०१८-१९ मध्ये ६ टक्के कपात आणि २०१९-२० मध्ये ५ टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे.
आयोगाने बेस्टकरिता २०१६-१७, २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० साठी वीजपुरवठ्याचा सरासरी खर्च अनुक्रमे ८.८१, ८.२७, ७.७९ आणि ७.४३ प्रति युनिट निर्धारित केला आहे. स्थिर खर्चाचा भाग ग्राहकांच्या स्थिर आकारातून अधिक प्रमाणात वसूल व्हावा, या धोरणानुसार आयोगाने निरनिराळ्या ग्राहकांच्या स्थिर आकारात अल्पशी दरवाढ केली आहे.
बेस्टने प्रत्येक वर्षासाठी ६.५० टक्के इतक्या प्रस्तावित केलेल्या वितरण हानीच्या लक्ष्याऐवजी आयोगाने, २०१६-१७, २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० करिता वितरण हानीचे लक्ष्य
अनुक्रमे ५.९०, ५.८०, ५.७० आणि ५.६० टक्के निश्चित केले आहे. (प्रतिनिधी)
वीजखरेदीचा प्रस्ताव सादर करा, बेस्टला निर्देश
बेस्टच्या एकूण खर्चापैकी वीजखरेदीवर होणारा खर्चाचा भाग मुख्य आहे. तो भाग ग्राहकांकडून वसूल केला जातो.
टाटा पॉवरच्या ट्रॉम्बे येथील निर्मिती प्रकल्पासोबत असलेला वीजखरेदी दर २०१८ मध्ये संपणार आहे.
बेस्टचे वीजदर : प्रतियुनिट (रुपयांत)
वर्गवारी२०१६-१७२०१७-१८
०-१००२.००१.८०
१०१-३००४.४५४.००
३०१-५००७.३०६.८०
५०० वर९.३०८.८०