बेस्ट पोसणार पांढरा हत्ती

By Admin | Published: November 4, 2016 05:31 AM2016-11-04T05:31:34+5:302016-11-04T05:31:34+5:30

सतत तोट्यात चालणाऱ्या वातानुकूलित बसगाड्या अखेर भंगारात काढण्याचा प्रस्ताव बेस्ट प्रशासनाने आणला.

Best Elementary White Elephant | बेस्ट पोसणार पांढरा हत्ती

बेस्ट पोसणार पांढरा हत्ती

googlenewsNext


मुंबई : सतत तोट्यात चालणाऱ्या वातानुकूलित बसगाड्या अखेर भंगारात काढण्याचा प्रस्ताव बेस्ट प्रशासनाने आणला. एसी बसनी पाच वर्षांत ८० कोटी रुपये महसूल मिळवला तर या बसवर ४०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. मात्र या बस अन्य ठिकाणी वापराव्यात अथवा त्यांचा लिलाव करावा, अशी सूचना करत हा प्रस्ताव बेस्ट समितीमध्ये फेटाळण्यात आला.
बेस्टने सात वर्षांपूर्वी २८० वातानुकूलित बसगाड्या खरेदी केल्या. यापैकी १०६ बस रस्त्यावर आहेत. इतर सर्व बस डेपोमध्ये धूळखात पडल्या आहेत. एसी बसमधून बेस्टला गेल्या पाच वर्षांत ८० कोटी रुपये महसूल मिळाला असून ४०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. एसी बसमधून तोटा होत असल्यास एसी बस बंद कराव्यात, अशी मागणी बेस्ट समिती सदस्य करत होते. मात्र एसी बस भंगारात काढण्याचे षड्यंत्र आखले जात आहे. एसी बसचा वापर इतर ठिकाणी होऊ शकतो. एसी बस लिलावास प्रतिसाद न मिळाल्यास
बस भंगारात काढण्यास
अनुमती द्यावी, असा प्रस्ताव प्रशासनाने सादर केला होता. हा प्रस्ताव मंजूर न करता बस लिलावात काढण्यास समिती सदस्यांनी अनुमती दर्शवली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Best Elementary White Elephant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.