बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे
By admin | Published: June 21, 2017 08:36 PM2017-06-21T20:36:30+5:302017-06-21T20:36:30+5:30
पगार वेळेत होत नसल्याने संपावर जाण्याचा इशारा देणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपला प्रस्तावित संप तूर्तास मागे घेतला आहे. बेस्ट प्रशासनाने मे महिन्याचा
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - पगार वेळेत होत नसल्याने संपावर जाण्याचा इशारा देणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपला प्रस्तावित संप तूर्तास मागे घेतला आहे. बेस्ट प्रशासनाने मे महिन्याचा अर्धा पगार कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे बेस्टने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही वर्षांपासून सातत्याने अडचणीत असलेल्या बेस्टची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. तिजोरीत खडखडाट असल्याने बेस्ट प्रशासनाने मे महिन्याचे अर्धे वेतनच जमा करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर 22 जूनपर्यंत पगार जमा न झाल्यास बेस्टचे कर्मचारी संपावर जातील असा इशारा बेस्ट वर्कर्स युनियनने दिला होता.