‘बेस्ट’चा संप सुरू, मुंबईकरांचे हाल अटळ, कर्मचारी प्रशासन बैठक निष्फळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 03:56 AM2017-08-07T03:56:24+5:302017-08-07T03:56:41+5:30

बेस्ट कामगारांच्या वेतनप्रश्नी महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि बेस्ट कर्मचारी कृती समितीमध्ये महापौर निवास येथे रविवारी झालेली बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे बेस्टचे सुमारे ३६ हजार कामगार रविवारी मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत.

 'Best' expansion begins; Mumbaikar's hall unattractive, staff management meeting is in vain | ‘बेस्ट’चा संप सुरू, मुंबईकरांचे हाल अटळ, कर्मचारी प्रशासन बैठक निष्फळ

‘बेस्ट’चा संप सुरू, मुंबईकरांचे हाल अटळ, कर्मचारी प्रशासन बैठक निष्फळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बेस्ट कामगारांच्या वेतनप्रश्नी महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि बेस्ट कर्मचारी कृती समितीमध्ये महापौर निवास येथे रविवारी झालेली बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे बेस्टचे सुमारे ३६ हजार कामगार रविवारी मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. महत्त्वाचे म्हणजे वेतनप्रश्नी महापालिका आयुक्त अजय मेहता जोपर्यंत लेखी आश्वासन देत नाहीत; तोपर्यंत बेस्ट कामगारांचा संप सुरूच राहणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. तर संपकऱ्यांवर ‘मेस्मा’अंतर्गत कारवाईचा इशारा बेस्ट प्रशासनाने दिला आहे.
रविवारी रात्री उशिरा बेस्ट संपाबाबत महापौर बंगल्यावरील बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आयुक्त अजय मेहता आणि बेस्ट कर्मचारी कृती समितीचे नेते उपस्थित होते. मात्र रात्री उशिरा झालेल्या बैठकीतही संपावर काहीच तोडगा निघाला नाही. परिणामी सोमवारी संप होणार असल्याचे कामगार नेते शशांक राव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर सुरू असलेला बेस्ट उपक्रम कायमच तोट्यात आहे. महत्त्वाचे म्हणजे तोट्यातील बेस्ट मार्ग आणि कर्जाचा डोंगर असलेल्या बेस्टने यापूर्वीच महापालिकेकडे आर्थिक मदत मागितली आहे. परंतु महापालिकेनेही हात वर केल्याने बेस्ट कामगार संघटनांनी संपाचे हत्यार उपसले आहे. महापौर निवासस्थानी झालेल्या बैठकीदरम्यान विश्वनाथ महाडेश्वर यांनी बेस्ट कामगारांनी संपावर जाऊ नये, असे आवाहन केले आहे. परंतु बेस्ट कृती समितीने लेखी आश्वासनाचा आग्रह धरला आहे.

‘बेस्ट’ला अनेक पर्याय
संपामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगर क्षेत्रात खासगी प्रवासी बससह स्कूल बस, कंपन्यांच्या बस आणि मालवाहक वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात येईल. टॅक्सी व आॅटोरिक्षा संघटनांना जास्तीत जास्त वाहने रस्त्यावर उतरवण्यास सांगण्यात आले आहे. ‘एसटी’लाही सेवा पुरविण्यास सांगण्यात आल्याची माहिती परिवहन विभागाचे अतिरिक्त आयुक्त एस. बी. सहस्रबुद्धे यांनी दिली.

सणासुदीत प्रवाशांना फटका
सोमवारी ऐन राखी पौर्णिमेच्या दिवशी हा संप होत असल्याने याचा फटका भावा-बहिणींना बसेल.
बेस्ट कामगार हे पालिकेचे कामगार असल्याने त्यांची जबाबदारी महापालिकेने घ्यावी. मागण्यांबाबत लेखी आश्वासन आयुक्तांनी दिल्याशिवाय संप मागे घेणार नाही, असे बेस्ट कृती समितीने जाहीर केले आहे.

कामगारांनी संपावर जाऊ नये
बेस्ट कामगारांनी संपावर जाऊ नये, अशी विनंती आम्ही केली आहे. मुंबईकरांवर संप लादला जाऊ नये. बेस्ट कामगारांचे प्रश्न सोडविण्याचे काम आम्ही प्रामाणिकपणे करत आहोत. यासाठी अवधी लागेल.
- विश्वनाथ महाडेश्वर, महापौर, मुंबई महापालिका

१० आॅगस्टला पगार
बेस्टच्या सर्व कामगारांनी सोमवारी कामावर रुजू व्हावे. जुलै महिन्याचे वेतन १० आॅगस्टला दिले जाईल. तोट्यातून बाहेर पडण्यासाठी उपाय सुरू आहेत.
- सुरेंद्र बागडे, महाव्यवस्थापक, बेस्ट

Web Title:  'Best' expansion begins; Mumbaikar's hall unattractive, staff management meeting is in vain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.