बेस्टचा नवा कृती आराखडा, बस ताफा कमी करून भाडेतत्वावर घेणार बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 10:06 PM2017-08-24T22:06:56+5:302017-08-24T22:07:39+5:30
बेस्ट बचावाचा पहिला आराखडा बाद ठरल्यानंतर प्रशासनाने नवीन आराखडा आणला आहे. मात्र या आराखड्यातही दुप्पट भाडेवाढची शिफारस करण्यात आली आहे.
मुंबई, दि. 24 - बेस्ट बचावाचा पहिला आराखडा बाद ठरल्यानंतर प्रशासनाने नवीन आराखडा आणला आहे. मात्र या आराखड्यातही दुप्पट भाडेवाढची शिफारस करण्यात आली आहे. प्रवासीवर्गात घट हाेण्याची भीती असल्याने चार कि.मी.पर्यंत काेणतीही वाढ प्रस्तावित नाही. त्यानंतर ६ ते ३० किलोमिटरपर्यंत १ ते १२ रुपये इतकी भाडेवाढ सुचवली आहे. त्याचबराेबर कर्मचाऱ्यांचे विविध भत्ते गोठवणे, बसताफा कमी करून भाडेतत्वावर बस घेणे, कर्मचारी कमी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव बेस्ट समितीपुढे सादर करण्यात आला आहे.
बेस्ट समितीपुढे सादर करण्यात आलेल्या या नवीीन आराखड्यात बेस्टचे दाेन किलो मीटरसाठी किमान भाडे आठ रुपयांऐवजी १६ रुपये आकारावे, अशी सुचना करण्यात आली आहे. मात्र या दुप्पट वाढीमुळे बेस्टच्या प्रवाशी वर्गात घट हाेईल, याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे ६ ते ३० किलो मीटरपर्यंत १ ते १२ रुपये तर वातानुकूलित बस सेवेसाठी ५ ते २० रूपयांची भाडेवाढ सुचवण्यात आली आहे. तसेच ७०, ५० व ४० रुपयांचे दैनिक पास दरात फेरबदल करून ९०, ६० व ५० रुपये रूपये करण्याचे प्रस्तावित आहे.
या याेजनांमध्ये कपात
आनंदयात्री योजने अंतर्गत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत बसपासवर ५० टक्के सवलत देण्यात येते. या योजनेला अल्प प्रतिसाद असल्याने योजना बंद करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
शालेय विद्यार्थ्यांचा बस पास १५० रुपये तर कनिष्ठ महाविद्यालययातील विद्यार्थ्यांचा बस पास ३०० रुपये आहे. यात वाढ करून पाचवीपर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांचा बस पास २०० रुपये, सहावी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा बस पास २५० रुपये तर कनिष्ठ महाविद्यालययातील विद्यार्थ्यांचा बस पास ३५० रुपये करण्याचे प्रस्तावित केले आहे.
कर्मचा-यांच्या भत्त्यांमध्ये कपात
कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता गोठवावा, "ब" श्रेणी अधिकाऱ्यांचा कार्यभत्ता व वैद्यकीय भत्ता खंडित करावा, मनुष्यबाळाचे नियोजन करण्यासाठी कर्मचाऱ्यांत कपात व भरती पूर्णतः बंद करावी.
शैक्षणिक सहाय्य बंद करावे, शिष्यवृत्ती योजना बंद करावी, उपहारगृह कंत्राटदारांना देण्यात येणारी अर्थसहाय्य बंद करावी, रजा प्रवास भत्ता गोठवावा,
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना बसपास योजना बंद करावी, रोख रक्कम हाताळणी भत्ता बंद करावा, अतिकालिन अ व ब श्रेणीतील अधिकाऱ्यांचा प्रवासभत्ता बंद करावा, सेवा सातत्य योजना तयार करावी अशा अनेक उपाययोजना या आराखड्यात सुचवण्यात आल्या आहेत.
बस ताफा कपात
-जुलै अखेरीस बेस्टचा ताफा ३७९० इतका होता. त्यातील ४५३ बसगाड्या मोडीत काढून ताफा ३३३७ इतका करावा.
-४० टक्के पेक्षा कमी वसुली असलेल्या मार्गांचा पुनर्विचार करावा.
-अकार्यक्षम १७०३ बसगाड्या मोडीत काढून १२५० मिनी, मिडी, वातानुकूलित बसगाड्या भाडेतत्वावर घ्यावात असे प्रस्तावित करण्यात आले आहे.
विराेध हाेण्याची शक्यता
-असा प्रस्ताव या आधीही बेस्ट समितीने फेटाळला असल्याने नव्याने सादर करण्यात आलेल्या या कृती आराखड्याला बेस्ट समिती व कर्मचाऱ्यांकडून विरोध हाेण्याची शक्यता आहे.
प्रस्तावित भाड़ेवाढ पुढीलप्रमाणे
साधी बस भाड़ेवाढ
किमी ......सध्याचे भाडे...प्रस्तावित भाडे.... भाडेवाढ
2 .............Rs 8 ...............Rs 8 ............ -
4 .............Rs 10 .............Rs 10 ........... -
6 .............Rs 14 .............Rs 15 ...........Rs 1
8 .............Rs 16 .............Rs 18............Rs 2
10 ...........Rs 18 .............Rs 22............Rs 4
12 ...........Rs 20 .............Rs 25............Rs 5
14 ...........Rs 22 .............Rs 28 ...........Rs 6
20 ...........Rs 26 .............Rs 34............Rs 8
30 ...........Rs 30 .............Rs 42 ...........Rs 12
एसी बस भाड़ेवाढ
किमी ... सध्याचे भाडे .....प्रस्तावित भाडे
2 .............Rs 15 .............Rs 20
4 .............Rs 20..............Rs 25
6 .............Rs 25 .............Rs 30
8 .............Rs 30 .............Rs 35
10 ...........Rs 35 .............Rs 40
20 ...........Rs 60 .............Rs 60
25 .......... Rs 75 .............Rs 65
30 ...........Rs 90 .............Rs 70