‘बेस्ट’चा दरवाढ प्रस्ताव

By admin | Published: April 7, 2017 06:10 AM2017-04-07T06:10:41+5:302017-04-07T06:10:41+5:30

आर्थिक संकटातून बाहेर पाडण्यासाठी बेस्ट प्रशासनाने काढलेला मार्ग मुंबईकरांच्या खिशाला चाट देणारा आहे.

The best offer for 'best' | ‘बेस्ट’चा दरवाढ प्रस्ताव

‘बेस्ट’चा दरवाढ प्रस्ताव

Next

मुंबई: आर्थिक संकटातून बाहेर पाडण्यासाठी बेस्ट प्रशासनाने काढलेला मार्ग मुंबईकरांच्या खिशाला चाट देणारा आहे. गेल्या वर्षीच तिकिटांच्या दरांमध्ये दोनदा वाढ करणाऱ्या बेस्टने पुन्हा भाववाढ सुचवली आहे. यावेळेस ही भाववाढ थेट ५० टक्के असेल. त्यामुळे किमान बस भाडे आठ रुपयांवरून १२ रुपये करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. हा प्रस्ताव बेस्ट समितीच्या पटलावर चर्चेसाठी येणार आहे.
पालिका प्रशासनाने मदतीचा हात देण्याआधी काही अटी ठेवल्या आहेत. हा काटकसरीचा कृती आराखडा बेस्ट समितीच्या बैठकीपुढे प्रशासनाने ठेवला आहे. यात कामगार महागाई भत्ता गोठवण्यापासून विविध भत्यांना कात्री लावण्याची शिफारस आहे. त्यानुसार कामगारांचा महागाई भत्ता १ एप्रिल २०१७ पासून गोठवण्यात येईल. वातानुकूलीत बस सेवा बंद, सर्वसाधारण- मर्यादिता बस तिकिटात कि.मी. मागे चार रुपये वाढ प्रस्तावित आहे.
पांढरा हत्ती ठरलेली वातानुकूलित बस सेवा बंद करण्यात येईल. तत्पूर्वी त्याचे किमान भाडे १५ रुपयांवरून २५ रुपये करण्यात येईल. याबरोबरच मासिक बसपासमध्ये वाढ, विद्यार्थी आणि पत्रकारांना दिलेल्या सवलती रद्द करून त्यात वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र ही वाढ केल्यास प्रवाशांमध्ये आणखी घट होईल. त्यामुळे भाडेवाढीचा प्रस्ताव बेस्टसाठी पायावर धोंडा पाडून घेण्यासारखा असल्याची भीती नगरसेवकांकडून व्यक्त होत आहे.
भत्ते, सवलतींना कात्री
एप्रिल २०१७ पासून महागाई भत्ता गोठवणे, वैद्यकीय भत्ता खंडित करणे, रजा प्रवास सहाय भत्ता, दूरध्वनी देयकांची बिले सेवा बंद करणे. सोबतच पाल्यांच्या वह्या, पुस्तके खरेदीवर आर्थिक मदत शिष्यावृत्ती योजना, वेतनश्रेणी आणि अन्य भत्ते इत्यादींच्या पुनर्रिक्षणाच्या बाबतीतील करार, नियमित होणाऱ्या विविध पदांच्या भरतीला स्थगिती दिली आहे.
यासोबतच बस मागार्चे सुसूत्रीकरण, बसताफ्यांची पुनर्रचना, वातानुकुलित बससेवा बंद करणे यासह भाडेतत्त्वावर बसगाड्या घेणे, प्रवास भाड्याची पुनर्रचना, बस पास दरात वाढ, विद्यार्थ्यांच्या बसपास दरात वाढ, आनंदयात्री योजना रद्द करणे, सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या बसपास दरात वाढ, पत्रकारांच्या बसपास दरात वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
>बेस्ट कर्मचारी जाणार संपावर
बेस्ट प्रशासनाकडून कामगारांच्या सेवाशर्तीमध्ये सुरू असलेले बदल बेकायदेशीर असल्याचा आरोप करत दि बेस्ट वर्कर्स युनियनने बेस्ट प्रशासनाला संपाची नोटीस दिली आहे. प्रशासनाने सेवाशर्तींमध्ये बदल केल्यास १४ दिवसांनंतर युनियनचे सर्व कर्मचारी बेमुदत संपावर जातील, अशी माहिती युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी दिली. यामुळे कर्मचाऱ्यांवर प्रचंड आर्थिक ताण येणार असल्याचे राव यांचे म्हणणे आहे. त्यामुळे संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्वसाधारण बस भाडे
कि.मी. विद्यमान दरप्रस्तावित दर
२८१२
४१०१४
६१४१८
८१६२०
१०१८२२
१२२०२४
१४२२२६
१७२४२८

Web Title: The best offer for 'best'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.