बेस्टच्या योजनांची झाडाझडती
By admin | Published: April 3, 2015 02:28 AM2015-04-03T02:28:13+5:302015-04-03T02:28:13+5:30
संकटातून बाहेर पडण्यासाठी निवडलेला भाडेवाढीचा मार्ग बेस्टला आर्थिक खड्ड्यात घालणारा ठरत आहे़ त्यामुळे प्रवासी व उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठी
मुंबई : संकटातून बाहेर पडण्यासाठी निवडलेला भाडेवाढीचा मार्ग बेस्टला आर्थिक खड्ड्यात घालणारा ठरत आहे़ त्यामुळे प्रवासी व उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठी आत्तापर्यंत हाती घेतलेल्या योजनांची झाडाझडती घेण्यास बेस्ट समितीने सुरुवात केली आहे़ घोषणाबाजीनंतरही केवळ कागदोपत्री राहिलेल्या योजनांवर श्वेतपात्रिका काढण्याची मागणीच बेस्ट समिती सदस्यांनी केली आहे़
१ फेब्रुवारीच्या भाडेवाढीनंतर महिन्याभरातच २ लाख १५ हजार प्रवासी घटले़ तरीही १ एप्रिलपासून नवी वाढ लागू करण्यात आली़ याचा नफा व तोटा महिन्याअखेरीस हाती येणार आहे़ परंतु घटणाऱ्या प्रवासी संख्येमुळे योजनांचे होते तरी काय? याचा शोध घेण्याची मागणी आता जोर धरत आहे़
१६०० बसगाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, मोबाइलद्वारे बेस्टचे बसमार्ग शोधणे या सर्व योजनांवर श्वेतपत्रिका काढण्याचे आदेश बेस्ट समितीचे अध्यक्ष अरुण दूधवडकर यांनी दिले आहेत़ (प्रतिनिधी)