वीज समस्यांसाठी ‘बेस्ट’ सज्ज

By admin | Published: June 11, 2016 02:16 AM2016-06-11T02:16:45+5:302016-06-11T02:16:45+5:30

पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होऊन तसेच विजेचा झटका बसून अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते.

'Best' Ready for Power Problems | वीज समस्यांसाठी ‘बेस्ट’ सज्ज

वीज समस्यांसाठी ‘बेस्ट’ सज्ज

Next


मुंबई : पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होऊन तसेच विजेचा झटका बसून अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. अशा घटना घडू नयेत आणि घडल्या तरी त्याचा सामना करता यावा म्हणून पावसाळ्यासाठी आता बेस्ट उपक्रम सज्ज झाले आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जागोजागी अतिरिक्त कर्मचारी वर्गाची नेमणूक करण्यात येणार असून, खंडित झालेला वीजपुरवठा कमी कालावधीत सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
मुंबई शहर आणि उपनगरांत बेस्ट, रिलायन्स, टाटा आणि महावितरण अशा चार वीज कंपन्यांकडून वीजपुरवठा केला जात आहे. उपनगरांत वीजपुरवठा करणाऱ्या रिलायन्स आणि टाटाने यापूर्वीच आपल्या वीज ग्राहकांसाठी मान्सून काळातील हेल्पलाइन सुरू केल्या आहेत. शिवाय आपत्कालीन परिस्थितीत वीजग्राहकांना मदत करण्यासाठी पथकेही तयार ठेवली आहेत.
आता शहरात वीजपुरवठा करणाऱ्या बेस्टनेही मान्सूनसाठी सज्जता दाखवली आहे. मान्सून काळात वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी बेस्टने कॉल सेंटर प्रस्थापित केले आहेत. हे कॉल सेंटर बिघाड दुरुस्ती केंद्र आणि देखरेख यंत्रणेशी जोडण्यात आले आहे. वीज ग्राहकांनी मान्सून काळात आपत्कालीन परिस्थितीची माहिती कॉल सेंटरवर कळवल्यास त्याचे निवारण जलदगतीने करणे बेस्टला सुलभ जाणार आहे. (प्रतिनिधी)
आपत्कालीनप्रसंगी खबरदारीचे उपाय म्हणून बेस्टला वीजपुरवठा बंद करावा लागतो. या काळात दाखल होत असलेल्या तक्रारींचे प्रमाण, त्याचे स्वरूप, पाणी तुंबल्यामुळे भूमिगत वीज वाहिन्या शोधण्यास होणारा विलंब आणि कर्मचारी वर्गाला कामावर हजर राहण्यास निर्माण होणाऱ्या अडचणी या घटकांचा विचार करता आणीबाणीच्या वीज ग्राहकांनी या काळात सहकार्य करावे, असे आवाहन बेस्टने केले आहे.
>विद्युत पुरवठा खंडित होणे व इतर तक्रारींसाठी २२८४३९३९ या क्रमांकावर संपर्क साधावा.
>वीज ग्राहकांनो हे करा...
पावसापासून बचाव करण्यासाठी वीज मीटर केबीन सिमेंटने बांधून घ्या.
केबीन जमिनीपासून उंचावर बांधा.
लाकडी केबीन सुरक्षित करा.
परवानाधारक विद्युत ठेकेदराकडून वायरिंग तपासा.
वीज मीटर केबीनमध्ये पावसाचे पाणी शिरल्यास मुख्य स्विच बंद करा.
त्रुटी पूर्णपणे दूर झाल्यानंतर विजेचे स्विच सुरू करा.
>वीज ग्राहकांनो
हे करू नका...
केबीनमध्ये पाणी गळत असल्यास हातमोजे, रबरी बूट, लाकडी साहित्याचा वापर केल्याशिवाय मीटर केबीनला स्पर्श करू नका.
विद्युत ठिणगी पडत असेल तर केबीनला स्पर्श करू नका.
ज्या सदनिकांना, घरांना अथवा इमारतींना तात्पुरता वीजपुरवठा देण्यात आला आहे त्यांनी फक्त अत्यावश्यक उपकरणांचा वापर करावा.

Web Title: 'Best' Ready for Power Problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.