बेस्ट कर्मचारी संपाच्या तयारीत

By admin | Published: August 28, 2016 03:21 AM2016-08-28T03:21:35+5:302016-08-28T03:21:35+5:30

मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रातील खासगी कंत्राटी परवाना व खासगी सेवा वाहन परवाना असणाऱ्या बसगाड्यांना मुक्त संचारास परवानगी देण्यात आली आहे़ यामुळे बेस्टचे अस्तित्वच

Best staff strike | बेस्ट कर्मचारी संपाच्या तयारीत

बेस्ट कर्मचारी संपाच्या तयारीत

Next

मुंबई : मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रातील खासगी कंत्राटी परवाना व खासगी सेवा वाहन परवाना असणाऱ्या बसगाड्यांना मुक्त संचारास परवानगी देण्यात आली आहे़ यामुळे बेस्टचे अस्तित्वच धोक्यात येणार असल्याने हा निर्णय मागे घेण्याची मागणी बेस्ट समिती सदस्यांनी शनिवारी केली़ याविरोधात सोमवारी बेस्ट कर्मचारी संप पुकारतील, असा इशारा बेस्ट कामगार सेनेने दिला आहे़
बेस्टची ताकद कमी करून खाजगीकरणास वाट मोकळी करून देण्याचा हा कट असल्याचा आरोप बेस्ट कामगार सेनेचे पदाधिकारी सुनील गणाचार्य यांनी केला आहे़ गावखेड्यात ४५ हजार बसगाड्यांची आवश्यकता असताना राज्य परिवहनाच्या गाड्या मुंबईत चालविण्याची परवानगी देण्यात येत आहे, यावर शिवसेनेचे सुहास सामंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे़ या प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा निर्णय मागे घेण्याची विनंती करणार आहोत़ निर्णय न झाल्यास सोमवारपासून टॅक्सीमनच्या संपात सहभागी होऊ, असा इशारा बेस्ट कामगार सेनेने दिला आहे़ बेस्ट वर्कर्स युनियन या संपात नाही़ (प्रतिनिधी)

Web Title: Best staff strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.