बेस्ट कामगारांचा संपाचा इशारा
By admin | Published: October 21, 2014 04:19 AM2014-10-21T04:19:13+5:302014-10-21T04:19:13+5:30
दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान (बोनस) मिळावा म्हणून बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी आझाद मैदानावर मोटारसायकल मोर्चा काढला
मुंबई : दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान (बोनस) मिळावा म्हणून बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी आझाद मैदानावर मोटारसायकल मोर्चा काढला. दिवाळीमध्ये बोनस मिळाला नाही, तर वीज उत्पादन विभागासह सुमारे ४५ हजार कर्मचारी व अधिकारी संपावर जातील, असा इशाराही मोर्च्यादरम्यान बॉम्बे इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनचे सरचिटणीस विठ्ठलराव गायकवाड यांनी दिला आहे.
गायकवाड म्हणाले, की बेस्ट प्रशासन तोट्यात सुरू असल्याचे कारण देत वीज कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्षे मिळणारे सानुग्रह तीन वर्षांपासून मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे १९७४ पासून सुरू असलेली सानुग्रह अनुदानाची परंपरा बंद पडली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.