बेस्टचीही ‘लेडिज स्पेशल’

By admin | Published: September 24, 2016 04:20 AM2016-09-24T04:20:28+5:302016-09-24T04:20:28+5:30

बेस्ट उपक्रम लवकरच महिला प्रवाशांसाठी विशेष बस सेवा सुरू करणार आहे.

Bestchhihi 'Ladies Special' | बेस्टचीही ‘लेडिज स्पेशल’

बेस्टचीही ‘लेडिज स्पेशल’

Next


मुंबई : बेस्ट उपक्रम लवकरच महिला प्रवाशांसाठी विशेष बस सेवा सुरू करणार आहे. तेजस्विनी योजनेंतर्गत ५० बसगाड्या बेस्ट प्रशासन खरेदी करणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे धक्के सहन करत प्रवास करण्यापासून महिलांची सुटका होणार आहे.
महिलांना सुरक्षित प्रवासाची हमी देण्याच्या उद्देशाने सरकारने ही योजना आणली. त्यानुसार मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि कल्याण-डोंबिवली या ठिकाणी तीनशे लेडिज स्पेशल बस गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली. बेस्ट उपक्रमाला या गाड्यांसाठी ५० टक्के निधी सरकारकडून मिळणार आहे. उर्वरित खर्च महापालिकेकडून मिळू शकतो. या बसबाबतचा प्रस्ताव बेस्टने सरकारकडे पाठवला आहे. यामध्ये बस ताफा, एकूण प्रवासी, महिला प्रवासी, महिलांसाठी सुरू करणे शक्य असलेले बस मार्ग आणि बस गाड्यांची संख्या याची माहिती सादर करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
> प्रतीक्षा संपली
बससाठी बेस्टच्या स्टॉपवर वाट बघण्याचा प्रवाशांचा त्रास आता संपणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी बस किती वेळात स्टॉपवर येईल? याची अचूक माहिती देणारे अ‍ॅप बेस्ट लवकरच आणणार आहे. याचे सादरीकरण बेस्ट समितीमध्ये करण्यात आले.
सध्या ही सिस्टीम बेस्टच्या १५ बसमध्ये बसवून त्याची चाचणी घेण्यात आली आहे. जीपीएस तंत्रावर हे अ‍ॅप काम करणार असल्याने प्रवाशांना बसची वेळ अचूक मिळणार आहे.
प्रवाशांना एखाद्या बसमार्गावर किंवा एखाद्या स्टॉपपर्यंत प्रवास करायचा असल्यास त्या मार्गावरील रुट, बस स्टॉप, भाडे याची तसेच एखादी बस निघून गेल्यास त्याच्या नंतरची बस किती वेळात स्टॉपवर येईल? याची माहिती मिळणार आहे.

Web Title: Bestchhihi 'Ladies Special'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.