‘बेटी बचाओ- बेटी पढाओ’ अभियान उसनवारीवर

By admin | Published: December 11, 2015 02:45 AM2015-12-11T02:45:35+5:302015-12-11T02:45:35+5:30

नऊ महिन्यांपासून निधीची प्रतीक्षा ; जनजागृती प्रभावित.

'Beti Bachao- Beti Padhao' Campaign on Yanwariyar | ‘बेटी बचाओ- बेटी पढाओ’ अभियान उसनवारीवर

‘बेटी बचाओ- बेटी पढाओ’ अभियान उसनवारीवर

Next

संतोष वानखडे / वाशिम: स्त्री-पुरुष लिंगगुणोत्तरातील तफावत कमी करणे आणि मुलींना शिक्षणाची हमी देण्याच्या उद्देशातून, राज्यातील १0 जिल्ह्यांत सुरू असलेल्या ह्यबेटी बचाओ- बेटी पढाओह्ण अभियानाला जवळपास दहा महिन्यांपासून निधीची प्रतीक्षा आहे. निधीअभावी सदर अभियान ह्यउधारीह्णवर सुरू असून, याचा विपरित परिणाम जनजागृतीच्या कार्यक्रमांवर होत आहे. मुलगा हाच वंशाचा दिवा असल्याच्या मानसिकतेतून स्त्री-पुरुष लिंगगुणोत्तरात कमालिची तफावत येत आहे. यातूनच स्त्री भ्रूण हत्या, लिंग निवड चाचणी आदी प्रकार घडत असल्याने यावर प्रभावी उपाययोजना म्हणून केंद्र सरकारने ह्यबेटी बचाओ-बेटी पढाओह्ण अभियान २१ फेब्रुवारी २0१५ पासून देशातील १00 जिल्ह्यांत सुरू केले. सदर अभियान महिला व बाल विकास मंत्रालय, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि मानव संसाधन विकास मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असून, यासाठी १00 टक्के निधीची हमी केंद्र शासनाने घेतली. मुलींचा जन्मदर कमी असलेल्या देशातील १00 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील बुलडाणा, वाशिम, बीड, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, उस्मानाबाद, सांगली व जालना या दहा जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यात सर्वात कमी लिंगगुणोत्तर प्रमाण बीड जिल्ह्यात ८0७ आहे. त्यानंतर जळगाव ८४२, अहमदनगर ८५२, बुलडाणा ८५५, औरंगाबाद ८५८, वाशिम व कोल्हापूर प्रत्येकी ८६३, उस्मानाबाद व सांगली प्रत्येकी ८६७, जालना ८७0 असे लिंगगुणोत्तर प्रमाण असून, ही चिंताजनक बाब आहे. राज्यातील या दहा जिल्ह्यांत लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत खात्री देणे, मुलींच्या जीवनमानाच्या सुरक्षिततेबाबत खात्री देणे, स्त्री-पुरुष लिंगगुणोत्तरातील तफावत कमी करणे ही प्रमुख चार उद्दिष्ट साध्य करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवण्यात आले. या दृष्टिकोनातून या अभियानाचा कृती आराखडाही आखण्यात आला.

Web Title: 'Beti Bachao- Beti Padhao' Campaign on Yanwariyar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.