‘नरभक्षक’ सोडून दुसराच वाघ मारल्यास खबरदार!
By Admin | Published: June 29, 2017 01:39 AM2017-06-29T01:39:17+5:302017-06-29T01:39:17+5:30
नरभक्षक वाघाला सोडून दुसराच वाघ मारला गेल्यास आणि नरभक्षक वाघाने आणखी कोण्या माणसाचा जीव घेतल्यास
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नरभक्षक वाघाला सोडून दुसराच वाघ मारला गेल्यास आणि नरभक्षक वाघाने आणखी कोण्या माणसाचा जीव घेतल्यास प्रधान मुख्य वन संरक्षकांना जबाबदार धरून त्यांच्यावर आवश्यक कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला.
ब्रह्मपुरी वन विभागात टी-२७ क्रमांकाच्या वाघाने दोन माणसांचे बळी घेतले. त्यामुळे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी शुक्रवारी आदेश देऊन या नरभक्षक वाघाला ठार मारण्याची परवानगी दिली. याविरुद्ध डॉ. जेरिल बनाईत यांनी जनहित याचिका
दाखल केली.
ओळख आवश्यक-
माणसाच्या जीवापेक्षा वाघ महत्त्वाचा नाही. परंतु नरभक्षक वाघाला मारण्यापूर्वी त्याची ओळख पटविणे आवश्यक आहे.
ारभक्षक वाघ समजून दुसरा वाघ मारला जाऊ नये, असे मौखिक मत न्यायालयाने सुनावणीदरम्यान व्यक्त केले. प्रकरणावर न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी व न्यायमूर्ती रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली.