भाजपचे मिशन इम्पॉसिबल? दीड कोटी सदस्य नोंदणीसाठी कार्यकर्त्यांची धावाधाव, कंत्राटदारांनी धुवून घेतला हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 06:58 IST2025-02-27T06:57:42+5:302025-02-27T06:58:02+5:30

भाजपाला दीड कोटी सदस्य जमेनात, 'क्रियाशील सदस्यां'नाच विविध शासकीय समित्यांवरील पदे दिली जातील. त्यामुळे सदस्य नोंदणीसाठी सगळेच धावपळ करत आहेत.

bhaajapacae-maisana-imapaosaibala-daida-kaotai-sadasaya-naondanaisaathai-kaarayakaratayaancai-dhaavaadhaava-kantaraatadaaraannai-dhauvauuna-ghaetalaa-haata | भाजपचे मिशन इम्पॉसिबल? दीड कोटी सदस्य नोंदणीसाठी कार्यकर्त्यांची धावाधाव, कंत्राटदारांनी धुवून घेतला हात

भाजपचे मिशन इम्पॉसिबल? दीड कोटी सदस्य नोंदणीसाठी कार्यकर्त्यांची धावाधाव, कंत्राटदारांनी धुवून घेतला हात

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने प्रदेश भाजपला पक्षाचे दीड कोटी प्राथमिक सदस्य नोंदणीचे टार्गेट दिले आहे. त्यामुळे अशी नोंदणी करून देणाऱ्या खासगी एजन्सीची मदत घेतली जात आहे. नोंदणीचे कंत्राट घेणाऱ्या काही व्यक्तींनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची फसवणूक केल्याचे उघड होत आहे.

या मोहिमेचे उद्घाटन नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते डिसेंबरमध्ये झाले होते. त्यानंतर मुंबईमध्ये भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी उत्तर प्रदेश, बिहारमधील काही व्यक्तींना अशा सदस्य नोंदणीचे कंत्राट दिले. त्यासाठी पैसेही दिले. मात्र, नोंदणीच्या नावाखाली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर आता त्यांनी पोलिसांत धाव घेतली आहे.

'क्रियाशील सदस्यां'ची तारांबळ
प्राथमिक सदस्य आणि क्रियाशील सदस्य असे सदस्यांचे दोन प्रकार भाजपमध्ये आहेत. ५० प्राथमिक सदस्यांची नोंदणी जो करेल त्याला 'क्रियाशील सदस्यत्व' बहाल केले जाते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अलीकडेच असे जाहीर केले, की केवळ 'क्रियाशील सदस्यां'नाच विविध शासकीय समित्यांवरील पदे दिली जातील. त्यामुळे सदस्य नोंदणीसाठी सगळेच धावपळ करत आहेत.

समाजमाध्यमांवर जाहिराती
आमच्याकडून पक्ष सदस्य नोंदणी करून मिळेल, अशा जाहिराती परराज्यांतील टोळक्यांनी समाजमाध्यमांवर केल्या होत्या. त्याला भुलून काही पदाधिकाऱ्यांनी पैसे मोजून त्यांना नोंदणीचे काम दिले आणि अंगलट आले. पैसेही गेले आणि सदस्य नोंदणीदेखील झाली नाही.
भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि सदस्य 3 नोंदणी मोहिमेचे संयोजक राजेश पांडे यांनी मात्र वेगळीच माहिती दिली. सदस्य नोंदणी करून करून देतो असे सांगणारे एक रॅकेट सक्रिय असून त्याबाबतची माहिती दिल्लीतील केंद्रीय कार्यालयाकडून आम्हाला देण्यात आली होती.
त्यानुसार आम्ही सायबर गुन्हे शाखेकडे 3 तक्रार नोंदवली आणि अशी संभाव्य फसवणूक वेळीच रोखली, असे त्यांनी 'लोकमत'ला सांगितले. भाजपमधील प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या बळावर नोंदणी करायची आहे इतर कोणाचीही व कोणत्या संस्थेची मदत घ्यायची नाही, असे त्यांना आधीच बजावण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: bhaajapacae-maisana-imapaosaibala-daida-kaotai-sadasaya-naondanaisaathai-kaarayakaratayaancai-dhaavaadhaava-kantaraatadaaraannai-dhauvauuna-ghaetalaa-haata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.