भागवत व ओवेसी यांचे हातात हात - दिग्विजय सिंह
By admin | Published: April 1, 2016 04:50 PM2016-04-01T16:50:53+5:302016-04-01T16:50:53+5:30
‘भारत माता की जय’ म्हणू नका असे कुराणमध्ये कुठेच लिहिलेले नाही.सरसंघचालक मोहन भागवत व एमआयएमचे अध्यक्ष ओवेसी यांचे हातात हात घालून काम सुरू आहे.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १ - ‘भारत माता की जय’ म्हणू नका असे कुराणमध्ये कुठेच लिहिलेले नाही.सरसंघचालक मोहन भागवत व एमआयएमचे अध्यक्ष ओवेसी यांचे हातात हात घालून काम सुरू आहे. या दोघांचीही ‘फूट पाडा व राज्य’ करा अशी कट्टरवादी विचारधारा आहे. काँग्रेसने तर ‘भारत माता की जय’ या ना-यावर देशाच्या स्वातंत्र्याचा लढा लढला आहे.
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘डिस्कवरी ऑफ इंडिया’मध्ये भारत ‘माता की जय’ची केलेली व्याख्या संघ व भाजपला समजविण्याची वेळ आली आहे, असा चिमटा अ.भा. काँग्रेस समितीचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी काढला.
पक्षाच्या आढावा बैठकीसाठी नागपुरात आले असता सिंह यांनी भाजप व संघ परिवारावर सडकून टीका केली. सिंह म्हणाले, जेएनयुमध्ये पाकिस्तानच्या समर्थनार्थ नारे दिले नसतानाही केवळ साम्यवादी विचाराचा असल्यामुळे कन्हैया कुमारला अटक करण्यात आली. मात्र, संसदेवर हल्ला करणा-या अफजल गुरूचे समर्थन करणा-या पीडीपीला जम्मू काश्मिरमध्ये सरकार बनविण्यासाठी भाजप कशी काय साथ देत आहे, हे भागवत यांनी स्पष्ट करावे.
संविधान व आरक्षणाचा विरोध करणारी भाजपा आता डॉ. आंबेडकरांना आपलेसे करू पाहत आहे. एकीकडे भागवत म्हणतात की आरक्षणाचा पुनर्विचार व्हावा, तर दुसरीकडे पंतप्रधान मोदी म्हणतात आरक्षण लागू राहील. त्यामुळे कोण खरे बोलत आहे,
हे या नेत्यांनी आधी स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली.