भागवत कथा म्हणजे ज्ञानयज्ञ सोहळा
By Admin | Published: May 16, 2016 12:58 AM2016-05-16T00:58:32+5:302016-05-16T00:58:32+5:30
भगवंताच्या प्रत्येक कथांमधून प्रत्येक जीवाचा उद्धार कसा करावा, हेच सांगितले आहे
पुणे : भागवत ग्रंथात केवळ कथा नाहीत तर भगवंताच्या प्रत्येक कथांमधून प्रत्येक जीवाचा उद्धार कसा करावा, हेच सांगितले आहे. भागवताकडे केवळ कथा म्हणून न पाहता, या कथांचे आपल्या जीवनात काय महत्त्व आहे आणि आपण त्यातील काय आत्मसात करायचे हे आपल्याला समजायला हवे. भागवत ग्रंथ म्हणजे ज्ञानयज्ञ सोहळा आहे. त्यामुळे त्यातील तत्त्वज्ञान समजून घ्यायला हवे, असे स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी सांगितले.
रेणुकास्वरूप मुलींच्या शाळेमध्ये निनाद, पुणेतर्फे आयोजित श्रीमद्् भागवत अद्वैतानंद सप्ताह सोहळ्याचे उद््घाटन स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या हस्ते रविवारी झाले. या वेळी प.पू. स्थितप्रज्ञानंद सरस्वती फुलगाव, मिलिंद चिटगोपीकर, किशोर खैराटकर, प्रवीण परदेशी, सुरेश पवार, विवेक खटावकर, माजी नगरसेवक उदय जोशी, शुभदा जोशी, संजय देशपांडे आदी उपस्थित होते.
उद््घाटनापूर्वी श्रीमद्् भागवत ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली.