‘भिडे-एकबोटेंवरून लक्ष विचलित करण्याचा डाव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 03:11 AM2018-01-25T03:11:26+5:302018-01-25T03:11:43+5:30

काँग्रेस-राष्ट्रवादीसह सर्व विरोधी पक्ष २६ जानेवारीला राज्यभर संविधान बचाव रॅली काढणार आहेत. त्यास प्रत्युत्तर म्हणून भाजपाकडूनही तिरंगा एकता यात्रा काढण्यात येणार आहे.

 'Bhaide-Ekboot point distract' | ‘भिडे-एकबोटेंवरून लक्ष विचलित करण्याचा डाव’

‘भिडे-एकबोटेंवरून लक्ष विचलित करण्याचा डाव’

googlenewsNext

पुणे : काँग्रेस-राष्ट्रवादीसह सर्व विरोधी पक्ष २६ जानेवारीला राज्यभर संविधान बचाव रॅली काढणार आहेत. त्यास प्रत्युत्तर म्हणून भाजपाकडूनही तिरंगा एकता यात्रा काढण्यात येणार आहे. मात्र, हा केवळ भीमा कोरेगाव दंगल आणि त्यातील आरोपी भिडे-एकबोटे यांच्यावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याने आंबेडकरी जनतेने या रॅलीत सहभागी होऊ नये, असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे सरचिटणीस ज. वि. पवार यांनी केले आहे.
मनोहर भिडे व मिलिंद एकबोटे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्यानंतरही पोलीस प्रशासन कोणतीच कारवाई करत नाही. भिडे यांना अटक होऊ नये, यासाठी खुद्द पंतप्रधान कार्यालयातून दबाव असल्याचे पवार यांनी सांगितले़
संविधान बचाव रॅलीशी भारिप बहुजन महासंघाचा कोणताही सहभाग अथवा संबंध नाही. भिडे-एकबोटे यांच्यावरून लक्ष विचलित करण्याचा सत्ताधारी आणि विरोधकांचा हा डाव असू शकतो, त्यामुळे आम्ही यात सहभागी होणार नाही. पोलिसांनी दंगलीतील आरोपींना तातडीने अटक करावी, असे भारिपचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title:  'Bhaide-Ekboot point distract'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.